voting day incident : चंद्रपूर १५ जानेवारी : महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज चंद्रपुरात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. प्रभाग क्रमांक १० (एकोरी प्रभाग) मध्ये राजकीय वाद विकोपाला गेल्याने नेहरू शाळा मतदान केंद्रावर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. (बंगाली कॅम्प प्रभागात राडा, महिला कार्यकर्त्याला मारहाण)
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, या प्रभागातील अपक्ष उमेदवार दीपा कासट यांचे पती ललित कासट यांना भाजप अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष राशीद हुसेन यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर दोन्ही बाजूचे समर्थक आमनेसामने आल्याने मतदान केंद्राबाहेर गोंधळ उडाला.
पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज: परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. जमावाला पांगवण्यासाठी आणि तणाव निवळण्यासाठी नेहरू शाळा केंद्रावर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या घटनेमुळे काही काळ मतदानाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता, मात्र आता चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. voting day incident
निवडणुकीच्या या रणधुमाळीत लोकशाहीचा उत्सव शांततेत पार पडण्याऐवजी अशा हिंसक घटना घडत असल्याने चंद्रपूरकरांमधून संताप व्यक्त होत आहे.
Leave a Comment