FDA Raid Chandrapur : भद्रावती - वर्ष २०१२ पासून संपूर्ण राज्यात सुगंधित तंबाखूवर शासनाने प्रतिबंध लावला मात्र आज सुद्धा सुगंधित तंबाखू चंद्रपूर जिल्ह्यात खुलेआम विकल्या जात आहे, चंद्रपूर शहर असो कि ग्रामीण भाग खर्रा मध्ये सुगंधित तंबाखू मिश्रण करीत मोठ्या प्रमाणात विक्री होतो, यासंबंधात अन्न व औषध विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी कापगते यांनी १५ एप्रिल रोजी केलेल्या कारवाई १३ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त करीत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. (दारू पिताना सासूने हटकले, जावयाची सटकली)
१५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता अन्न सुरक्षा अधिकारी कापगते पंचसहित घोडपेठ बस स्टॉप जवळील समीर उर्फ सुमेध गोवर्धन देवगडे यांच्या पान ठेल्याजवळ गेले, कापगते यांनी पान ठेल्याची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये सुगंधित तंबाखू हुक्का शिशा मजा १०८ चे ५० ग्राम वजनाचे ४४ टिन व खर्रा ३ किलो असा एकूण १३ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
खर्रा मिश्रणाचे नमुने विश्लेषणाकरिता सोबत घेत मुद्देमाल जप्त करण्यात आला, जप्त केलेला सुगंधित तंबाखूचा पुरवठा बाबत देवगडे यांना विचारणा केली असता त्याने सांगितले कि चंद्रपुरातील वसीम झिमरी यांच्याकडून हा सुगंधित तंबाखू खरेदी केला आहे. तरुणांमध्ये कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजार यामुळे पसरतो, त्यामुळे समीर उर्फ सुमेध देवगडे व वसीम झिमरी विरोधात भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अनव्ये कलम २६ (१), २६ (२)(i), २६ (२)(iv), २७ (३)(e), ३० (२)(a), ५९, १२३, २२३, २७४, २७५, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a Comment