Congress Wins । अनैसर्गिक युतीला धोबीपछाड, चंद्रपुरात मनपा सभापती निवडीत काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना पाजले पाणी

April 17, 2026 by Prakash Hande

Congress Wins Key Seats : चंद्रपूर  - चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती,उपसभापती तसेच झोन क्र. १, २ व ३ सभापती पदाची निवड करण्यासाठी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या कालावधीत पार पडलेल्या विशेष सभेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संगीता मंगल भोयर यांची महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणुन तर तर उपसभापतीपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्याच सईदाबी ताजू शेख यांची निवड करण्यात आली.  (रविकांत टेम्भूरकरला न्याय द्या)

 


   महिला व बालकल्याण समितीच्या १२ सदस्यांपैकी १ सदस्य अनुपस्थित असल्याने ११ सदस्यांनी हात उंचावुन केलेल्या मतदानात सभापती,उपसभापती यांची निवड करण्यात आली.तसेच प्रत्येक झोनच्या प्रभागातील नगरसेवक यांनी त्या झोनसाठी हात उंचावुन मतदान केले. यात प्रभाग समिती क्र. १ च्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे रवि वामनराव लोणकर, प्रभाग समिती क्र. २ च्या सभापतीपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वैशाली प्रकाश चंदनखेडे तर प्रभाग समिती क्र. ३ च्या सभापतीपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे रामनरेश कुंवरलाल यादव यांची निवड जाहीर करण्यात आली.

 


  नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे महानगरपालिकेच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असून, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सदर सभा जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आयुक्त अकुनुरी नरेश,उपायुक्त शेषराव टाले,उपायुक्त संदीप चिद्रवार, मनपा अधिकारी कर्मचारी व सदस्य उपस्थीत होते. निवडीनंतर जिल्हाधिकारी व आयुक्त यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. Congress Victory Chandrapur

 

भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा फटका आज सभापती निवडणुकीत बघायला मिळाला, भाजप-उबाठा या अनैसर्गिक युतीची सत्ता असलेल्या मनपात कांग्रेसने सत्ताधाऱ्यांना धोबीपछाड देत सभापती निवडणुकीत बाजी मारली. झोन ३ मध्ये भाजप पक्षाकडे बहुमत असताना सुद्धा त्याठिकाणी कांग्रेस पक्षाने विजय मिळविला. वरिष्ठ पातळीवरून सभापती पदासाठी नगरसेवकांची नावे आली मात्र एका गटाला न्याय तर दुसऱ्यावर अन्याय असा समज झाल्याने गटबाजीने निवडणुकीत रंग दाखवीत कांग्रेस पक्षाला एकप्रकारे समर्थन दिल्याचे चित्र आहे. 

Leave a Comment

+