MSEDCL Electricity Theft । सावधान! मीटरमध्ये छेडछाड पडली महागात; चंद्रपुरात 'अशा' पद्धतीने पकडली ४० हजारांची वीज चोरी

April 17, 2026 by Prakash Hande

MSEDCL Electricity Theft Case : चंद्रपूर - वीज चोरी थांबावी यासाठी महावितरण वीज ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर लावत आहे, मात्र मीटर हा ग्राहकांच्या मर्जीने लावण्याची अट असल्याने बहुतांश भागात मीटर अजूनही बसविण्यात आलेले नाही, त्यामुळे काही नागरिक वीजबिल जास्त येत असल्याने वीज मीटर मध्ये छेडछाड करीत आहे. असाच एक प्रकार शहरातील घुटकाला वार्डात बघायला मिळाला. (चंद्रपुरात सुगंधित तंबाखूचा व्यापार, दोघांवर गुन्हे दाखल)

 

१० फेब्रुवारीला घुटकाला वॉर्ड हिंदुस्थान स्क्रॅप जवळ राहणारे अब्दुल वहाब अब्राहिम कुरेशी यांच्या घरी सहायक अभियंता वीजबिल वसुली व वीजचोरी पथकातील वैभ जुमडे वीज मीटरची पडताळणी करण्यासाठी गेले होते. यावेळी मीटर चा आऊटगोइंग वायर काढत १०० वॅट चा बल्ब जोडला असता १ मिनिटात ७ पल्स चो नोंद झाली, कुरेशी यांच्या घरची वीजमीटर हा ६४०० रिव्होल्यूशनचा असल्याने १ मिनिटात १२ पल्स यायला पाहिजे, जुमडे यांना वीजचोरीचा संशय आला. मीटरची गती हळू करण्यात आली होती.

 

मीटर ची पडताळणी करीत मीटर काढण्यात आला, मीटर च्या मागील बाजूला छिद्र करीत मीटर च्या इनकमिंग काळ्या वायरला कट करण्यात आले होते. ज्यामुळे वीज मीटर ची गती कमी झाली होती. या गंभीर प्रकारचे व्हिडीओ चित्रण करण्यात आले. वहाब कुरेशी यांनी अनधिकृतपणे वीज वापर करीत महावितरण कंपनीच्य एकूण २ हजार २९४ वीज युनिटची चोरी केल्याने त्यांनी ४० हजार ९३८ रुपयांचे आर्थिक नुकसान केले.

 

कुरेशी यांनी वीज चोरी केल्याचे कबूल करीत २० फेब्रुवारी पर्यंत वीज बिल भरण्याचे आश्वासित केले होते मात्र त्यांनी वीजबिल भरले नाही त्यामुळे वहाब कुरेशी यांच्यावर शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय विद्युत अधिनियम (सुधारणा) २००३ कलम १३५ अन्वये १६ एप्रिलला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

+