police slow to act on missing person case । 🔍 माझी आई कुठे आहे?, 👀 राजकीय व्यक्ती असती तर मिळाला असता न्याय?

January 17, 2026 by Prakash Hande

police slow to act on missing person case

police slow to act on missing person case : चंद्रपूर - चिमूर शहरातील नेहरू वॉर्ड येथील रहिवासी 64 वर्षीय अंजना केशवराव कामडी 8 मे 2025 पासून घरा बाहेरून बेपत्ता आहे. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही आई कुठेही सापडली नाही तेव्हा चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु 1 महिना उलटूनही चिमूर पोलिस प्रशासनाला आईचा शोध घेण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. राजकीय किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या नातेवाईकांना शोधण्यात पोलिस प्रशासन तत्परता दाखवते, परंतु सामान्य जनतेला मदत करण्यात पुलिस प्रशासनाकडून निष्काळजीपणा किंवा उशीर केला जाता असा आरोप बेपत्ता महिलेची मुलगी वंदना गिरडकर ने पत्रकार परिषदेत केला आहे.

हिशोब दे ना, आणि घडला हत्येचा थरार


बेपत्ता अंजना केशवराव कामडी(64) ही चिमूरमधील नेहरू वॉर्ड येथील रहिवासी आहे. मोठी बहीण आणि मुलगा आईसोबत राहतात. बहीण आणि तिचा मुलगा नोकरी करतात. 8 मे रोजी दुपारी 2 वाजता बेपत्ता अंजना कामडी घराबाहेर पडली. मोठी बहीण संध्याकाळी कामावरून घरी परतली तेव्हा आई घरी नव्हती. तिने अन्य बहिणींशी संपर्क साधला आणि नातेवाईकां कडे ही विचारणा केली पण आईचा कुठेच पता लागला नाही. त्यावेळी तिचा मोबाईल आणि चष्मा घरी होता. police slow to act on missing person case

१ महिना उलटला, पोलिसांचा विलंब

आईला चष्म्याशिवाय दिसत नाही, मग ती घराबाहेर कशी जाऊ शकते असा प्रश्न यावेळी वंदना यांनी उपस्थित केला. दुपारची वेळ असल्याने सर्व लोग घरात होते त्यामुळे आसपास च्या लोकांनी आईची काहीच कल्पना नही. सर्वत्र शोध घेतल्यानंतर 9 मे रोजी चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. परंतु 1 महिना उलटूनही पोलिसांना आई सापडत नाही. पोलिसांना वारंवार विचारणा केल्यानंतरही प्रयत्न सुरू असल्याचे सांगून ते शोध लावण्यास विलंब करत आहेत. daughter criticizes police handling missing mother

तक्रार दाखल केल्यानंतर घराजवळील सर्व सीसीटीव्ही कॅमेरा चे फुटेज तपासले असते तर आई नक्कीच सापडली असती असा आरोप वंदना यांनी केला. परंतु पोलिसांनी 7 दिवसांनंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामुळे आई अंजना सापडत नाहीये. या संदर्भात जिल्हाधिकारी, एसपी, पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या प्रकरणात उपस्थित असलेल्या तिन्ही बहिणींनी सांगितले की त्यांना आईच्या मालमत्ते साठी किंवा जादूटोण्यासाठी तिचे अपहरण केल्या जाऊ शकते असा संशय तीन्ही बहीनीं नी केला आहे. family accuses police of inaction missing mother

https://youtu.be/qeug68ldQF4?si=-3eb8V14oFplEhw6

पोलिसांचे प्रयत्न कमी

पालिकेच्या दुर्लक्षे मुळे चिमूरमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, अन्यथा एक तरी कैमेरा मध्ये आईचे फुटेज टिपले असते. चिमूर पोलिसां चे प्रयत्न त्यांच्या आईला शोधण्यात कमी पडत असल्याचा आरोप वंदना यांनी केला. राजकीय किंवा प्रतिष्ठित व्यक्तीचा नातेवाईक बेपत्ता झाल्यावर पोलिस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करते, मग सामान्य माणसाच्या नातेवाईकांना शोधण्यात विलंब का होतो? असा प्रश्न वंदना गिरडकर यांनी विचारला. आई अंजना कामडी यांच्या बेपत्ता होण्याचा तपास गुप्तचर विभाग किंवा गुन्हे अन्वेषण कडे सोपवून न्याय देण्याची मागणी वंदना गिरडकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. पत्रकार परिषदेत वंदना गिरडकर, ज्योत्स्ना इटनकर, अर्चना तडस उपस्थित होते.

Leave a Comment

+