Last Day Campaign : चंद्रपूर १३ जानेवारी - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या असून शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शन केले. या शेवटच्या दिवशी चर्चा फक्त भिवापूर प्रभाग क्रमांक १४ मधील भाजप उमेदवार अमोल शेंडे यांची होती. (भिवापूर प्रभागात दिग्गजाला आव्हान देणारा युवा उमेदवार अमोल शेंडे चर्चत)
पहिल्यांदा मनपा निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावणाऱ्या अमोल शेंडे यांनी ४ वेळा नगरसेवक असणाऱ्या दिग्गज नेत्याला आव्हान दिले आहे. मागील ७ वर्षांपासून अमोल शेंडे हा तरुण प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव झटत होता. नगरसेवक नसताना सुद्धा अमोल शेंडे यांनी प्रभागात तब्बल ६ कोटींचा निधी आंत विकासकामे केली आहे.
भिवापूर प्रभाग क्रमांक १४ मध्ये अमोल शेंडे ला भाजपकडून उमेदवारी मिळाली. मागील १२ दिवसापासून भिवापूर प्रभागात प्रचाराचा सपाटा अमोल ने सुरु केला होता, यादरम्यान जनतेचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हजारो नागरिकांची रॅली काढत शेंडे यांनी शक्तिप्रदर्शन केले. Last Day Campaign
४ वेळा नगरसेवक राहिलेल्या दिग्गज नेत्याला शेंडे यांनी आव्हान दिले असून १६ जानेवारीच्या निकालात ते जॉईंट किलर ठरू शकतात अशी जनमानसात चर्चा सुरु आहे.
Leave a Comment