Female tiger death : चंद्रपूर ११ जानेवारी - चंद्रपूर वनविभागातील पायली-भटाळी बीटातील चिंचोली शेतशिवारात आज सकाळी वाघाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. मृतक वाघ हि मादी असून तिचे वय साधारण २ ते ३ वर्षे आहे. वाघिणीचे सर्व अवयव शाबूत आहे. (चंद्रपुरात आढळला वाघाचा मृतदेह)
ताडोबा जवळील पायली भटाळी बिट मध्ये सकाळी चिंचोली गावातील नागरिकांना सकाळच्या सुमारास वाघिणीचा मृतदेह इरई नदीकाठावरील डोहात तरंगताना दिसला, याबाबत वनविभागाला नागरिकांनी माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचे पशुवैद्यकीय डॉ. कुंदन पोडचलवार आणि पशुसंवर्धन विभागाचे सेवानिवृत्त सहायक आयुक्त डॉ. कडुकर यांनी मृत वाघिणीचे शवविच्छेदन केले. वनविभागाने आवश्यक नमुने घेत ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यासंबंधी प्रक्रिया केली असून याबाबत मृत्यू नेमका कशामुळे झाला त्याची माहिती मिळेल. नवीन वर्षातील वाघाच्या मृत्यूची हि पहिली घटना आहे. Female tiger death
वाघिणीचा मृतदेह पाण्यात आढळला, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता पण वाघिणीचे सर्व अवयव शाबूत होते, वाघिणीचा मृतदेह पाण्यात बुडाल्याने झाला अशी शक्यता नाही. मात्र वाघिणीचा मृतदेह मागील २ ते ३ दिवसापासून त्याठिकाणी असल्याने वनविभागाला याबाबत माहिती न मिळणे म्हणजेच त्याठिकाणी गस्त केल्या जात नाही. मागील वर्षी नोव्हेम्बर महिन्यात चिंचोली गावात एका ६५ वर्षीय व्यक्तीला वाघाने उचलून नेले होते त्यानंतर सुद्धा वनविभागाने उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही.
Leave a Comment