mental abuse of minors in educational hostels । विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे गूढ कायम; एकास अटक, प्राचार्यासह तिघांचा शोध सुरू

January 17, 2026 by Prakash Hande

mental abuse of minors in educational hostels

mental abuse of minors in educational hostels : चंद्रपूर २२ नोव्हेम्बर (News 34) - जिल्ह्यातील प्रतिष्ठित चांदा शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेतील जनता करिअर लाँचरच्या वसतिगृहात अल्पवयीन मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २० नोव्हेम्बरला घडली. वसतिगृहात होणाऱ्या त्रासामुळे या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणी जनता महाविद्यालयाच्या प्राचार्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या एकाला अटक करण्यात आली असून अन्य तीन जण फरार आहेत, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र या आत्महत्येचे नेमके कारण काय याचे गूढ अद्याप कायम आहे.

Read Also : चंद्रपुरातील गाढ झोपेत असलेल्या लोकप्रतिनिधीसाठी महत्वाची बातमी

चांदा शिक्षण प्रसारक मंडळ ही शैक्षणिक संस्था विदर्भातील सर्वात मोठया शैक्षणिक संस्थेत गणली जाते. या संस्थेचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे आहेत, या संस्थेच्या अधिनस्थ अनेक शाळा कॉलेजस चालविण्यात येतात, त्याचप्रमाणे या संस्थेने वर्ष २००९ मध्ये जनता करिअर लॉन्चर ची सुरुवात केली होती. mental abuse of minors in educational hostels

जनता करिअर लॉन्चर मध्ये गुलाब सुदरी यांचा १७ वर्षीय मुलगा CET चे शिक्षण घेत होता, जनता करिअर लॉन्चर च्या वसतिगृहात अल्पवयीन मुलगा राहत होता, मात्र त्याला वॉर्डन लक्ष्मण रमाजी चौधरी, व्यवस्थापक प्रेमा झोटिंग, सल्लागार विष्णुदास शरद ठाकरे व प्राचार्य आशिष क्रिष्णाजी महातले हे मानसिक त्रास देत होते. होणाऱ्या त्रासाची माहिती मुलाने वडिलांना सुद्धा दिली मात्र वडिलांनी त्याची समज काढून त्याला परत पाठविले.

त्या १७ वर्षीय मुलाला स्वतःवर होणारा त्रास सहन झाला नाही आणि त्याने वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केली, पोलिसांनी गुन्हा दाखल करीत वॉर्डन लक्ष्मण रमाजी चौधरी ला अटक केली असून उर्वरित ३ आरोपी पसार झाले आहे, पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहे.

जनता करिअर लॉन्चर चे संचालक अशोक जीवतोडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते आत्महत्या प्रकरणावर म्हणाले कि आम्ही आमच्यापरीने चौकशी समिती गठीत केली असून याबाबत अधिक माहिती मिळवीत आहो, पोलीसांचा तपास सुरु असून लवकरच सत्य बाहेर येईल. mental abuse of minors in educational hostels

यापूर्वी सुद्धा एका शैक्षणिक संस्थेत मुलाने वसतिगृहात आत्महत्या केली होती, त्याला सुद्धा मानसिक त्रास देण्यात आल्याची माहिती आहे. आता पुन्हा शैक्षणिक संस्थेत असा प्रकार घडल्याने वसतिगृहात कर्मचाऱ्यांद्वारे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या मानसिक त्रासावर प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलावे अशी मागणी होत आहे.

Leave a Comment

+