जुने चेहरे विरुद्ध नवे विचार! प्रभाग १५ मध्ये काँग्रेस विरुद्ध शिंदे गटाची थेट लढत

January 17, 2026 by Prakash Hande

Educated Woman Candidate : चंद्रपूर ६ जानेवारी - चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रचार सध्या मोठ्या प्रमाणात व जोमात सुरु आहे, मनपा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांनी उमेदवारी देताना घोळ केला असला तरी काही ठिकाणी सुशिक्षित उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरविल्याने मतदार आता नव्या चेहऱ्यांना संधी देणार अशी चित्रे सध्या या रणधुमाळीत बघायला मिळत आहे. (चंद्रपुरात १२ उमेदवार करणार भाजपचा प्रचार)

चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर प्रभाग क्रमांक १५ या प्रभागात वर्ष २०१७ च्या निवडणुकीत नागरिकांनी विविध पक्षांच्या उमेदवारांना निवडून दिले होते, यंदा तसाच बदल होणार कि काय असे चित्र या प्रभागात दिसत आहे. कांग्रेस ची थेट लढत माजी शिवसेना शिंदे पक्षाशी आहे.

प्रभाग क्रमांक १५ विठ्ठल मंदिर वार्ड सर्वसाधारण महिला क गटातून उभ्या असलेल्या भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या उमेदवार राधा प्रफुल पुलगमकर यांची प्रभागात चांगलीच चर्चा आहे, विशेष म्हणजे उच्चशिक्षित महिला उमेदवार कांग्रेसने दिल्याने प्रभागात बदलाचे वारे निर्माण झाले आहे.

विशेष बाब म्हणजे प्रभागात खासदार धानोरकर यांच्या निधीतून अनेक विकासकामे झालेली आहे, विकासकामे व प्रभागाच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून राधा पुलगमकर या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहे, निवडून आल्यावर प्रभागात मोफत सेतू सेवा, दर्जेदार रस्ते, सामाजिक भवन निर्मिती, अमृत योजनेद्वारे प्रभागात १०० टक्के नळजोडणी, बालोद्यान, शासकीय योजनांचा लाभ देणारे केंद्र, दर महिन्याला जनता दरबार, विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची निर्मिती असा प्रभागासाठी जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला आहे. Educated Woman Candidate

सामाजिक कार्यात रमलेल्या व आता थेट जनतेची सेवा करीत प्रभागात विकासरूपी कामे करणार असा संकल्प केलेल्या राधा पुलगमकर यांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांची प्रभागात टक्कर शिवसेना शिंदे पक्षासोबत होणार आहे. एका बाजूला माजी नगरसेवक सीमा रामेड्वार तर दुसऱ्या बाजूला नव्या विकासाच्या संकल्पना सह उच्चशिक्षित राधा पुलगमकर यांच्यात थेट टक्कर आहे. मतदार आता जुन्या चेहऱ्याना कंटाळले असून राजकारणात उच्चशिक्षित उमेदवारांना संधी देणार अशी चिन्हे आहे. १५ जानेवारीला मतदान व १६ जानेवारी रोजी मतमोजणीच्या दिवशी प्रभागातील चित्र स्पष्ट होणार.

Leave a Comment

+