private companies misusing government property । खासगी कंपनीकडून सरकारी मालमत्तेचा वापर; बेले यांनी केले धक्कादायक खुलासे

January 17, 2026 by Prakash Hande

private companies misusing government property

private companies misusing government property : चंद्रपूर, [२७ जून]: चंद्रपूर शहरातील पठाणपुरा येथील मल्लनिसारण शुद्धीकरण केंद्राच्या शासकीय जागेवर विश्वराज एन्व्हायरमेंट प्रा. लि. या खासगी कंपनीने बेकायदेशीरपणे सोलर पॅनल लावून अतिक्रमण केल्याचा आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

चंद्रपुरात बायपास मार्गाची नितांत गरज - खासदार धानोरकर

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील मल्लनिसारण शुद्धीकरण केंद्राच्या जागेवर विश्वराज एन्व्हायरमेंट प्रा. लि. या खासगी कंपनीने अवैधरित्या आपली खासगी मालमत्ता, म्हणजेच सोलर पॅनल, स्थापित केले आहेत. या गंभीर आरोपांसोबतच, चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त श्री. विपिन पालीवाल यांच्यावरही आर्थिक गैरव्यवहाराचा आणि पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पालीवाल यांनी संबंधित कंपनीकडून आर्थिक लाभ घेऊन शासकीय जागेवर बेकायदेशीरपणे सोलर पॅनल ठेवण्यास परवानगी दिल्याचा आरोप बेले यांनी केला आहे. solar panel installation on government land

https://youtube.com/shorts/QZ1ol7fyfE8?si=0KNdll_LCKsllmGW

चौकशीची मागणी

संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, शासकीय जागेवरील अवैध सोलर पॅनल त्वरित हटवून ती जागा पुन्हा चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या ताब्यात घ्यावी आणि भविष्यात अशी अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी राजेश वारलुजी बेले यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. सार्वजनिक हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने ही तक्रार सादर करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

https://youtu.be/IhPKmjL9OEA?si=q08mdABTUD8HFu9T

या प्रकरणी शासनाकडून त्वरित लक्ष घालून कारवाई केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या आरोपामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आयुक्त विपिन पालीवाल यांच्या भूमिकेची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

+