Independent Candidate Support : चंद्रपूर - ३ जानेवारी 2026 रोजी जलनगर, जटपुरा प्रभाग क्रमांक 7 मधील अपक्ष उमेदवार नीलूभैय्या खान यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपा उमेदवार छबुताई वैरागडे, प्रमोद क्षीरसागर, रवि लोणकर,भाग्यश्री हांडे यांना आपले जाहीर समर्थन दिले. (कांग्रेसच्या बंडखोर उमेदवाराचा शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा)
चंद्रपूर मनपाच्या निवडणुकीत राजकीय वातावरण दररोज बदलत असून अपक्ष उमेदवार आता आपला पाठिंबा भाजपच्या उमेदवारांना देत आहे. जटपुरा प्रभाग क्रमांक ७ मध्ये निलूभैय्या यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण त्यांनी २ जानेवारीला आपला उमेदवारी अर्ज मागे घेत थेट भाजपच्या उमेद्वारांना जाहीर पाठिंबा दिला.
नीलू खान यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी सभेमध्ये त्यांनी आपले जाहीर समर्थन दिले. विकासाला पूर्ण रूपाने चालना मिळावी व प्रभागातील इतर भागांचा जो सर्वांगीण विकास छबूताईंच्या कार्यकाळात झाला, त्याचप्रमाणे जल नगरच्या परिसरात देखील विकासाची कामे व्हावी याच उद्देशाने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आपले जाहीर समर्थन दर्शविले आहे.
या छोटेखानी सभेला राजेश नागपुरे, सुनीता नागपुरे, शकुंतला कार्लेकर, आबिद खान, नीलू खान ,जावेद खान, शिवा भैय्या, इमरान शेख, पठाण शालुबाई ,अनुसया कार्लेकर, शरद कांबळे, नंदकिशोर बल्लावार, अतुल मांढरे, गणेश कांबळे ,इमरान भाई, मकसूद भाई, इकबाल भाई, इरफान भाई, राजेंद्र रघाताटे व अमित वैरागडे सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Comment