MSRTC reserved seats for disabled : चंद्रपूर २८ सप्टेंबर २०२५ - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसेसमध्ये दिव्यांगांसाठी आसन क्रमांक ३, ४, ५ आणि ६ आरक्षित ठेवण्यात आले आहेत. कुठल्याही थांब्यावरून दिव्यांग प्रवासी बसमध्ये चढल्यास त्यांना ही आरक्षित सीट उपलब्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी बस कंडक्टरची आहे. मात्र, बस कंडक्टरकडून सीट उपलब्ध करून दिली जात नसल्याच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल वाहतूक महाव्यवस्थापकांनी घेतली आहे.
औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या पार्श्वभूमीवर, २६ सप्टेंबर रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार, यापुढे अशी कोणतीही तक्रार आल्यास संबंधित विभागीय वाहतूक अधिकारी (DTO) आणि डेपो व्यवस्थापक (DM) यांच्यावर थेट कारवाई करण्याची चेतावणी देण्यात आली आहे.
सामान्यतः, महिला आणि इतर प्रवाशांकडून बसमधील पुढील सीट क्र. ३ ते ६ वर बसण्यास प्राधान्य दिले जाते. जेव्हा दिव्यांग प्रवासी कंडक्टरला आरक्षित सीटची विनंती करतात, तेव्हा अनेकदा त्यांना सहकार्य मिळत नाही आणि कंडक्टर आपली जबाबदारी टाळतात. यामुळे दिव्यांगांना सामान्य प्रवाशांसमोर उभे राहून प्रवास करावा लागतो. अनेकदा कंडक्टर UDID कार्डाची मूळ प्रत किंवा झेरॉक्स असूनही तिकीट देण्यास नकार देतात आणि त्यांच्याकडे हीन भावनेने पाहिले जाते. २६ सप्टेंबरच्या नवीन आदेशात या सर्व बाबी तातडीने थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. what to do if bus conductor denies reserved seat to disabled
नवीन आदेशात खालील गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत:
या निर्देशांचे पालन न केल्यास आणि तक्रार प्राप्त झाल्यास, संबंधित कंडक्टर, तपास अधिकारी आणि पर्यवेक्षकाची जबाबदारी निश्चित केली जाईल. तसेच, भविष्यात अशा तक्रारी वारंवार आल्यास थेट विभागीय वाहतूक अधिकारी आणि डेपो व्यवस्थापक यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट चेतावणी मुंबईतील वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिली आहे.
डिव्हिजनल ट्राफिक ऑफिसर, चंद्रपूर
पुरुषोत्तम व्यवहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आदेश मिळाल्यानंतर बसमध्ये स्टिकर (सूचनापत्र) लावले जात आहेत. दिव्यांगांच्या आरक्षित सीटवर बसलेल्या सामान्य प्रवाशांना सूचना देण्याची जबाबदारी बस कंडक्टरची आहे. त्याचप्रमाणे महिला आणि ज्येष्ठांसाठी आरक्षित सीट्स बस सुरू होण्याच्या ठिकाणापासून उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. प्रवाशांना सहयोग न केल्यास कंडक्टरवर कारवाई करण्यात येईल."
तथापि, ५ सप्टेंबर रोजी आदेश येऊनही वर्षभरात २० हून अधिक तक्रारी आल्याने हा दुसरा आदेश काढावा लागला, त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते हे येणारा काळच ठरवेल. MSRTC reserved seats for disabled
Leave a Comment