tobacco smuggling news update । बाबुपेठ येथील युवकाकडून लाखोंचा तंबाखू जप्त

January 17, 2026 by Prakash Hande

tobacco smuggling news update

tobacco smuggling news update : राजुरा - ५ जून रोजी राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी ५ लक्ष ९९ हजारांचा सुगंधित तंबाखू सहित एकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत राजुरा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. police tobacco seizure

आज ५ जून रोजी राजुरा पोलिसांनी संविधान चौकात नाकेबंदी केली होती, यादरम्यान ऑटो क्रमांक MH३४ D ६३३९ ला थांबवित त्याची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू ईगल हुक्का, होला हुक्का, विमल पान मसाला असा एकूण ५ लक्ष रुपयांच्या मालासहित गुन्ह्यात वापरलेला ऑटो एकूण किंमत ५ लक्ष ९९ हजार ३२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

महिलांनो सावध व्हा- भद्रावतीमध्ये चैन स्नॅचिंग ची घटना

यावेळी पोलिसांनी ऑटो चालक अविनाश आबाजी शेंडे राहणार बाबुपेठ चंद्रपूर याला ताब्यात घेतले आहे.आरोपीविरुद्ध अन्न व सुरक्षा मानके कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

वर्ष २०१२ पासून राज्यात प्रतिबंधित असणारा सुगंधित तंबाखू चंद्रपूर जिल्ह्यात सर्रासपणे विकल्या जात आहे, चंद्रपूर शहरातील प्रत्येक चौकात खर्रा यामध्ये हा सुगंधित तंबाखू मिक्स करण्यात येतो. मात्र अन्न व औषध प्रशासन या माफियांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

https://youtu.be/IhPKmjL9OEA?si=ASwDZXbISBvanP9r

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात पोउपनि भीष्मराज सोरते, पोलीस कर्मचारी पांडुरंग हाके, विक्की निवार्ण, प्रभाकर कोराम, जुमनाके, महेश बोलगोडवार,अविनाश बांबोळे, शफिक शेख, आनंद मोरे व शरद राठोड यांनी केली.

Leave a Comment

+