fire in Chandrapur | चंद्रपूरमध्ये पुन्हा भीषण आग! बाबूपेठ उड्डाणपुलाखालील भंगार दुकान पेटले

January 17, 2026 by Prakash Hande

fire in Chandrapur

fire in Chandrapur : काही दिवसांपूर्वी चंद्रपुरातील नागपूर मार्गावर असलेल्या भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली होती, आता पुन्हा तशीच घटना शहरात घडली आहे. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बाबूपेठ उड्डाणपूलाच्या खाली असलेल्या भंगाराच्या दुकानाला पहाटे 5 वाजता अचानकपणे आग लागली. local fire incident news

चंद्रपुरात उष्णतेचा कहर, 5 दिवस शाळांना सुट्टी जाहीर करा

विशेष बाब म्हणजे सदर भंगाराचे दुकान हे रेल्वेच्या जागी स्थित असून त्या बाजूला मोठी लोकवस्ती आहे. आगीने रौद्ररूप धारण केले होते, मात्र सजग नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करीत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ ठरला.

https://youtu.be/i9LHRwuocrA?si=cj8e-8qM363HfWWZ

शहरातील भंगाराचे दुकान आता धोकादायक असल्याचे ठरत असून पालिकेने यावर लवकरच तोडगा काढायला हवा अन्यथा उष्ण लाटेत जळत असलेल्या चंद्रपुरात मोठी दुर्घटना होणार ही शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment

+