illegal cockfighting gambling Chandrapur । 🔥 कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार! खेळाडूंचा भंडाफोड

January 17, 2026 by Prakash Hande

illegal cockfighting gambling Chandrapur

illegal cockfighting gambling Chandrapur : चंद्रपूर - १७ ऑगस्ट रोजी रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने अवैधपणे कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या जुगार बहाद्दर विरोधात कारवाई केली, या कारवाई ३ आरोपी सह ५ लाख ८८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चंद्रपुरात २४ वर्षीय युवकाला मेफेड्रोन पावडर विक्री प्रकरणी अटक

मौजा जांभरला गावाच्या तलावाजवळ काही इसम कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळत आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने जांभरला या गावातील तलावाजवळ धाड मारली. यावेळी एकूण १५ कोंबडे, त्यापैकी ३ मृत कोंबडे, ६ दुचाकीवाहन सह रोख १५ हजार ५०० रुपये असा एकूण ५ लाख ८८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर जुगार हा अजयपूर मधील विशाल गावंडे चालवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

हे आहेत जुगार बहाद्दर

यावेळी जुगार खेळणारे आरोपी ३८ वर्षीय फारुख बहादूर शेख चंद्रपूर, ४६ वर्षीय मुकेश नामदेव दशमवार राहणार जुनोना चौक, बाबुपेठ व ३५ वर्षीय राजसिंग बहादूरसिंग पटवा राहणार शिवाजी चौक मूल यांना अटक झाली. आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. cockfight gambling crime in Chandrapur

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, चेतन गज्जलवार, इम्रान खान, सतीश अवथरे, किशोर वाकाटे, सुमित बरडे, हिरालाल गुप्ता, प्रफुल्ल गारघाटे व शशांक बदामवार यांनी केली.

Leave a Comment

+