karmaveer award for senior journalists । वरोरा-बल्लारपूरचे पत्रकार ठरले कर्मवीर पुरस्काराचे मानकरी

January 17, 2026 by Prakash Hande

karmaveer award for senior journalists

karmaveer award for senior journalists : चंद्रपूर - चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूरच्या वतीने शुक्रवार 01 ऑगस्ट 2025 ला सकाळी 11 वाजता पत्रकार दिन व कर्मवीर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात

१ ऑगस्ट रोजी होणार सन्मान

वरोरा नाका पत्रकार संघाचे कार्यालय येथे आयोजित सोहळ्यात वरोरा येथील जेष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी व बल्लारपूर येथील जेष्ठ पत्रकार मंगल जीवने यांना कर्मवीर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह,उ‌द्घाटक व मार्गदर्शक म्हणून दैनिक नवराष्ट्रचे वृत्त संपादक डॉ.प्रा.गणेश खवसे व प्रमुख अतिथी म्हणून सिडीसीसी बँक
चंद्रपूरचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने केले आहे.

Leave a Comment

+