Prahar Sanghatana Chakka Jam Andolan : चंद्रपूर - सातबारा कोरा व दिव्यांग बांधवांच्या प्रश्नावरून प्रहार संघटनेने राज्यात चक्काजाम आंदोलन छेडले असून सर्वत्र प्रहारच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आहे. प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करा अशी मागणी घेऊन आमरण उपोषण केले होते. मात्र अजूनही त्यावर ठोस निर्णय झाला नसल्याने प्रहार आक्रमक झाली आहे.
वीज ग्राहकांना महावितरणचा दणका
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज गडचांदूर-कोरपना राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन छेडले. सकाळपासूनच रस्त्यावर ठिय्या देऊन महामार्ग रोखून धरल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. सुमारे दोन तासांपर्यंत चक्काजाम सुरू होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलकांशी चर्चा केली आणि रस्ता मोकळा करण्यात यश आले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. prahar protest

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांगाच्या प्रश्नावरुन प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.. अशी मागणी करत बच्चू कडूंनी विदर्भात पदयात्राही काढली होती. आता बच्चू कडू यांनी सरकारला घेरण्यासाठी रस्त्यावरील लढाईला सुरुवात केली आहे. आज राज्यभर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चक्का जाम आंदोलन सुरु आहे.
Leave a Comment