चंद्रपुरात १३.५० ग्रॅम एमडीसह २ तरुणांना अटक

January 17, 2026 by Prakash Hande

Police raid MD drugs : चंद्रपूर ५ डिसेंबर (News३४) - चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ (एमडी) मेफेड्रोन ची विक्री करणाऱ्या २ तरुणांना अटक करीत त्यांचेजवळून १३.५० ग्राम एमडी सह २ लक्ष २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांविरोधात गुन्हे शाखा मोहीम राबवित कारवाई करीत आहे. जुगार असो कि अंमली पदार्थाची विक्री यावर प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांकडून सुरु आहे. (हे वाचा - स्थानिक गुन्हे शाखेची वाळू तस्करावर कारवाई)

एमडी तस्करी वाढली

चंद्रपुरात काही वर्षांपासून गांजा व एमडी पावडरची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, यावर नियंत्रण यावे यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत असली तरी छुप्या मार्गाने हे पदार्थ जिल्ह्यात यदाखल होत आहे.

म्हाडा कॉलोनी मध्ये राहणारे २४ वर्षीय प्रांजल राकेश तिवारी व २४ वर्षीय अदनान जाकीर शेख राहणार म्हाडा कॉलोनी हे दोघे एमडी पावडरची विक्रीसाठी नागपूर रोडवरील ढाब्याजवळ आले होते. Police raid MD drugs

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

गुन्हे शाखेला याबाबत गोपनीय माहिती प्राप्त होताच दोघांना ढाब्याजवळून अटक केली, आरोपी प्रांजल तिवारी व अदनान शेख कडून १३.५० ग्राम एमडी पावडर, रोख रक्कम सह दोन मोबाईल असा २ लक्ष २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघांवर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये NDPS अधिनियम अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.

यशस्वी कारवाई पथक

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, हिरालाल गुप्ता यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास सपोनि निलेश वाघमारे करीत आहे.

Leave a Comment

+