gambling in small towns । जुगार खेळायचं? चलो गडचांदूर

January 17, 2026 by Prakash Hande

gambling in small towns

gambling in small towns : गडचांदूर (शहर) – चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरामधील लक्ष्मी टॉकीज परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगाराच्या अड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. वार्ड क्रमांक ४ या भागात सट्टा पट्टी, झेंडी मुंडी यांसारखे जुगार बेधडकपणे सुरू असून, स्थानिक प्रशासन व पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

चंद्रपुरात घरफोडी करणाऱ्या महिलेला अटक

पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात मोहीम राबविण्यात येत असली, तरी गडचांदूरमधील काही भागांत हे धंदे खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे. कप्तान चांगला असला तरी सर्व सैनिक चोख कामगिरी बजावत आहेतच, असं म्हणता येणार नाही, असं या परिस्थितीकडे पाहून जाणवतं. local gambling news

लक्ष्मी टॉकीज परिसरात कुणाचे अभय?

या परिसरातील जुगार अड्डे कोणाच्या आश्रयाने सुरू आहेत, हा प्रश्न स्थानिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकदा पोलिसांची गस्त होऊनही, जुगारांचे अड्डे पुन्हा पुन्हा उघडत आहेत. त्यामुळे कारवाई खरंच प्रभावी आहे का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कामगारांना जुगाराच्या गर्तेतून कोणी बाहेर काढणार?

गडचांदूर हे एक औद्योगिक शहर असून, येथे सिमेंट कारखान्यांमुळे मोठ्या प्रमाणावर बाहेरील कामगार कामासाठी येतात. काही कामगार मिळालेल्या कमाईतून थोडेसे पैसे जुगारात लावून अधिक मिळविण्याच्या आशेने सर्व काही गमावून बसतात. परिणामी, अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडत आहेत.

local gambling news

आगामी धोका — 'जुगाराचे हब' बनण्याची शक्यता

जर अशीच परिस्थिती राहिली तर गडचांदूर येथील काही भाग भविष्यात ‘जुगाराचे केंद्र’ बनतील, हे निश्चित. त्यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणेस अधिक कठोर कारवाई करत या अड्ड्यांना कायमस्वरूपी बंद करण्याची गरज आहे.

Leave a Comment

+