Action against illegal Moha Hat Bhatti liquor : नागभीड २४ नोव्हेम्बर (News३४) - नागभीड पोलीस स्टेशनच्या हद्दीत जंगल परिसरात सुरु असलेल्या अवैध मोहा हातभट्टी दारू अड्ड्याबाबत पोलिसांनी मोहीम राबवित मोहा नष्ट करण्यात आला, या मोहिमेत पोलिसांनी तब्बल २ लक्ष १७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.
नागभीड पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तालुक्यातील कांपा जंगलात विविध ठिकाणी सुरु असलेल्या मोहा हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये पहिल्या कारवाईत २५० लिटर मोहादारू व १ हजार ८०० लिटर मोहफूल सडवा व साहित्य जप्त करण्यात आले, या कारवाई दरम्यान २६ वर्षीय आदित्य प्रदीप उके हा पसार झाला.
दुसऱ्या कारवाईत २०५ लिटर मोहदारू, मोहाफूल सडवा १ हजार ५०० किलो सह साहित्य जप्त केले, या कारवाई दरम्यान आरोपी २७ वर्षीय रोहित प्रकाश अलोणे हा सुद्धा पसार झाला. पोलिसांनी दोन्ही कारवाई मध्ये जप्त मुद्देमाल जागेवरच नष्ट केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वात पोउपनि अजिंक्य गोविंदलवार, पोलीस कर्मचारी किशोर देशमुख, भरत घोळवे, ज्ञानेश्वर गिरडकर, विशाल पेंदाम, संदीप मडावी व दामोदर करंबे यांनी केली.
Leave a Comment