Farmer Killed in Tiger Attack : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पाहिल्याचं जानेवारी महिन्यात मानव वन्यजीव संघर्षाचे ३ बळी गेले. यामध्ये २ वाघ तर १ बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला. ३० जानेवारीला चंद्रपूर तालुक्यातील ताडोबा जंगला लगतच्या चोरगाव मधील ६५ वर्षीय शेतकरी उद्धव वारलूजी मोहुर्ले हे नेहमीप्रमाणे शेतात गेले होते यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने मोहुर्ले यांच्यावर हल्ला करीत ठार केले. (बिबट्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू)
शेतकरी उद्धव मोहुर्ले हे ३० जानेवारीला १२ वाजता वरवट चोरगाव मार्गावरील शेतात कामासाठी गेले होते. रोज दुपारी १२ वाजता शेतीवर जाणे व सायंकाळी ७ वाजेपर्यंत घरी परतणे असा त्यांचा नित्यक्रम होता. सायंकाळी मोहुर्ले हे घरी न आल्याने कुटुंबांनी त्यांची शोधाशोध केली, मात्र त्यांचा कुठे शोध लागला नाही, सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबवली असता कंपार्टमेंट क्रमांक ५८५ मध्ये उद्धव मोहुर्ले यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळला. उत्तरीय तपासणीसाठी शेतकरी मोहुर्ले यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.
आपल्या शेतातील कामे करण्यासाठी जाणे धोकादायक बनले असून वनविभागाने तात्काळ त्या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Leave a Comment