police crackdown on cattle trafficking gangs : गडचांदूर - काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने कत्तलीसाठी नेत असलेल्या गोवंश जनावरसहित कोट्यवधींचा मुद्देमाल महाराष्ट्र तेलंगाणा सीमेवर पकडला होता, आता पुन्हा गडचांदूर पोलिसांनी १२ जुलै रोजी ३९ गोवंश जनावरे सहित १९ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करीत ३ आरोपीना अटक केली आहे.
१२ जुलै रोजी गडचांदूर पोलिसांना गोवंश जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा भोयगाव ते नारंडा या मार्गावर नाकेबंदी केली करून वाहनाची तपासणी करणे सुरु केले, काही वेळात त्याठिकाणी mh४० TC ४८१२ आयशर वाहन आले, पोलिसांनी वाहनांची पाहणी केली असता त्यामध्ये ३९ गोवंश जनावरे क्षमतेपेक्षा अत्यंत निर्दयपणे डांबून नेत होते. illegal cattle trade seized 39 animals
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची भाजपची रणनीती
गडचांदूर पोलिसांनी आयशर चालक सहित ४ आरोपींवर गुन्हा नोंदवित गोवंश जनावरांची सुटका केली. पोलिसांनी हाफिज खान गुफरान खान, करीम खान नबी खान व सादिक नवाब खान तिघे राहणार गडचांदूर यांना अटक करण्यात आली तसेच नागपुरातील पाहिजे असलेला आरोपी शेख इब्राहिम शेख इस्माईल वर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पोलिसांनी १९ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोउपनि राधिका गायकवाड, पोलीस कर्मचारी शीतल बोरकर, बळवंत शर्मा, प्रकाश बाजगीर, सूरज ढोले, मनोहर जाधव, साईनाथ उपरे, श्रीनिवास सोडणार, रमेश कार्लेवाड यांनी केली.
Leave a Comment