Chandrapur Ravan Dahan Cancelled : चंद्रपूर - चंद्रपुरात मागील अनेक वर्षांपासून सतत रावण दहनाचा कार्यक्रम महाकाली मंदिर परिसरात केल्या जातो मात्र यंदा रावण दहन कार्यक्रम झाला नाही, नागरिक विजयादशमी २ ऑक्टोबर रोजी महाकाली मंदिर परिसरात मोठ्या संख्येत पोहोचले मात्र त्यांच्या हाती केवळ निराशा आली.
अवघ्या ४ तासात आरोपी अटक, वाहनचालक मास्टरमाइंड
रावण दहनाचा कार्यक्रम का रद्द झाला? महाकाली महोत्सवाच्या पेंडाल मुळे तर कार्यक्रम रद्द झाला नाही ना? अशी चर्चा कार्यक्रम बघायला आलेल्या हताश नागरिक करीत होते. समाज माध्यमांवर कार्यक्रम का खंडित झाला अश्या विविध चर्चा रंगल्या होत्या. नागरिकांना आधी वाटलं कि महाकाली महोत्सवाच्या पंडाल मुळे कार्यक्रम रद्द झाला असेल पण तस काहीच झालेलं नव्हतं.
याच उत्तर सार्वजनिक दसरा महोत्सव मंडळाने २ ऑक्टोबर रोजीच दिले, सध्या राज्यात सर्वत्र पावसामुळे हाहाकार माजला आहे. अनेकी जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने लाखो नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला. त्यामुळे राज्यातील अतिवृष्टी बघता महाकाली मैदानात साजरा होणार दसरा महोत्सव आयोजकांनी रद्द केला. याबाबत शहरात त्यांनी बॅनर लावलेले होते.

सण उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात नागरिक साजरे करतात, मात्र त्या पूरग्रस्त नागरिक व शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी उभे राहत आपण यंदा महोत्सव साजरा करायचा नाही असा विचार मनात आणत दसरा महोत्सव मंडळाने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. रावण दहन बघण्यासाठी आलेले नागरिक हताश झाले होते मात्र आयोजक मंडळाच्या निर्णय कळल्यावर त्यांनी त्यांचे कौतुक केले.
Leave a Comment