घुग्गुस नगरपरिषद उपाध्यक्ष निवडणूक, कांग्रेसचे २ गट, व्हीप जारी

January 17, 2026 by Prakash Hande

Congress Party Whip : घुग्घूस ६ जानेवारी : घुग्गुस नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीत कांग्रेस पक्षाने बाजी मारली, नगराध्यक्ष सह बहुमताने नगरसेवक निवडून आले मात्र आता नगराध्यक्ष पदासाठी कांग्रेस विरुद्ध कांग्रेस असे चित्र निर्माण झाले आहे. उपाध्यक्ष पदावरून कांग्रेसचे दोन गट तयार झाले आहे. (एबी फॉर्ममुळे पुन्हा गोंधळ, भाजप उमेदवार झाल्या अपक्ष)

 

नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदाकरिता 07 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता निवडणूक होत असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गटनेते राजु रेड्डी यांनी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान करावा असा पक्ष आदेश 'व्हिप जारी केला आहे. सध्या काँग्रेस पक्षाच्या गटात 14 नगरसेवकांचा समावेश आहेत. दोन अपक्ष उमेदवार काँग्रेस पक्षात सहभागी झाले असून सदर व्हिप त्यांच्यावर ही लागू होतो. त्यामुळे पक्षातील उपाध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन रेड्डी यांनी केले आहे.

 

घुग्गुस शहरातील जनतेने कांग्रेस पक्षाला बहुमताचा कौल दिला, कांग्रेस पक्षाला मतदारांनी केलेल्या मतदानाचा अपमान करू नका, पक्षाच्या विरोधात मतदान केले तर त्या नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई करू असा इशारा रेड्डी यांनी दिला असून कारवाईमुळे नगरसेवक पद हि धोक्यात येणार त्यामुळे पक्षविरोधी काम करू नये असेही रेड्डी यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

+