chital hit by speeding vehicle : जुनोना, [२९ जुलै, २०२५]: जुनोना गावाजवळच्या मार्गावर भरधाव वाहनाने धडक दिल्याने एका चितळाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी उघडकीस आली. ही घटना रविवारी (दि. २७) रात्रीच्या सुमारास घडली असावी, जेव्हा चितळ रस्ता ओलांडत होते.
चंद्रपुरातील जेष्ठ पत्रकार कर्मवीर पुरस्काराचे ठरले मानकरी
या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मेश्राम, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडसेलवार, तसेच दिनेश खाटे आणि किरण बावस्कर हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली.
मृत चितळाचे शवविच्छेदन वनविकास महामंडळाच्या बांबू डेपोमध्ये करण्यात आले. त्यानंतर, त्याच परिसरात चितळावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महामार्गांवरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा वन्यजीव अपघातांना बळी पडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी रस्त्यावरून जाताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
Leave a Comment