Free mock test for students । "NEET-MHT-CET ची तयारी आता मोफत – चंद्रपूरमध्ये २९ मार्चला मॉक टेस्ट!"

January 17, 2026 by Prakash Hande

Free mock test for students

Free mock test for students : शिवसेना, युवासेना चंद्रपूर जिल्हा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आयोजित चंद्रपूर जिल्हा व शहरातल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत महासराव सिईटीचे आयोजन चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरीता त्यांच्या उज्वल भविष्यासाठी चंद्रपूर युवासेना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने येत्या 29 तारखेला सकाळी 10 वाजता अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सीईटीचा ,मॉक टेस्ट आयोजन करण्यात आलेले आहे. MHT-CET mock test practice

केरळच्या धर्तीवर आता महाराष्ट्रात लॉटरी मॉडेल

यासंदर्भात २१ मार्चरोजी शासकीय विश्रामगृहात युवासेनेने पत्रकार परिषद घेत मॉक टेस्ट बाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे, पूर्व विभागीय सचिव युवासेना व सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ निलेश बेलखेडे, युवासेना सहसचिव व युवतीसेना जिल्हाप्रमुख रोहिणीताई पाटील, जिल्हा युवासेना विस्तारक संदीप रियाल, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे उपस्थित होते.

दरवर्षी युवासेना तर्फे शैक्षणिक हिताचे कार्य केल्या जाते या अनुषंगाने राज्यात निशुल्क मॉक टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती हर्षल काकडे यांनी दिली, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांनी माहिती दिली कि विद्यार्थ्याचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचा लाभ घेत आपले उज्वल भवितव्य घडवावे हे उद्दिष्ट ठेवून महाराष्ट्रात वैद्यकीय, अभियांत्रिकी,फार्मा तसेच विधी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी NEET तसेच MHT-CET ची माॅक टेस्ट (सराव परीक्षा) चे मोफत आयोजन करण्यात येत आहे.
तरी या सराव परीक्षेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा याकरिता १२ वी (विज्ञान) शाखेतील आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांना या सराव परीक्षेचा लाभ घ्यावा. Career preparation for 12th students

चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली कि, चंद्रपूर जिल्ह्यात अनेक होतकरू विद्यार्थी आहे, आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात भविष्य उज्वल करायचे असते मात्र त्यांना त्याबाबत ठराविक माहिती उपलब्ध नसते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आम्ही त्या होतकरू विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षेची पूर्वतयारी बाबत संपूर्ण माहिती देतो म्हणजे भविष्यात स्पर्धात्मक परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत नाही, चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी या निशुल्क मॉक टेस्ट चा लाभ घ्यावा यासाठी चंद्रपूर युवासेना प्रयत्नशील आहे. आयोजित पत्रकार परिषदेत विनय धोबे जिल्हा समन्वयक,सुमित अग्रवाल जिल्हा चिटणीस,चेतन बोबडे कॉलेज कक्ष लोकसभा संघटक, युती सेना उपजिल्हाधिकारी धनश्री हेडाऊ आदींची उपस्थिती होती. Medical entrance exam preparation free

Leave a Comment

+