Muslim community helping flood relief Punjab । घुग्घुस मधील मुस्लिम बांधवांकडून 2.20 लाखांची मदत पंजाब पूरग्रस्तांसाठी

January 17, 2026 by Prakash Hande

Muslim community helping flood relief Punjab

Muslim community helping flood relief Punjab : चंद्रपूर - वर्ष २०२५ मध्ये देशातील पंजाब या राज्यात आस्मानी संकट कोसळले, पंजाब राज्यात आलेल्या पुराने लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले, अनेकांचा मृत्यू झाला, या संकटातून सदर नागरिक बाहेर निघावे यासाठी देशपातळीवरून मदत होत असून चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस मधून मुस्लिम बांधवानी सामाजिकतेचे भान राखत एक कर्तव्य म्हणून छोटीशी मदत पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी गोळा केली आहे.

पुराचा धोका, चंद्रपूर भोयेगाव मार्ग बंद

घूग्घूस येथील मुस्लिम बांधवान कडून पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी 2 लाख 20 हजार 786 रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. समस्त मुस्लिम बांधवाच्या सहकार्याने 2,20,786 रुपयांचा निधी गुरुद्वारा सिंह सभा घुग्गुस यथे जमा करणात आला आहे.

सामाजिक कार्य

यात प्रामुख्याने आजम खान, मोमीन शेख, अनिस सिद्दीकी, इर्शाद कुरेशी, बाबू सिद्दीक़ी,अज़हर शेख ,सानू सिद्दीकी ,मुस्लिम खान, इस्लाम अहमद, इकरार भाई, जुबेर शेख, फैझान खान आणी समस्त मुस्लिम बांधव यांनी देणगी गोळा करण्यासाठी हातभार लावला.

Leave a Comment

+