Private Bus Accident : व्याहाड खुर्द (चंद्रपूर): चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर शनिवारी (दि. २४) दुपारी एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात ३६ प्रवाशांपैकी ८ जण गंभीर जखमी झाले असून, इतर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. (सिनेट सदस्य बेलखेडे यांच्या कॉल मुळे वाचली नोकरी)
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०४ जीपी १७३६ क्रमांकाची खासगी बस ३६ प्रवाशांना घेऊन चंद्रपूरवरून गडचिरोलीच्या दिशेने जात होती. सावली तालुक्यातील चकपिरंजी गावाजवळील टोलनाक्याजवळ ही बस आली असता, अचानक एक दुचाकी बससमोर आली. दुचाकीला वाचवण्यासाठी चालकाने बस वळवली, मात्र वेग अधिक असल्याने बस थेट रस्त्याखाली जाऊन पलटी झाली.
अपघात होताच टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून शासकीय व खासगी डॉक्टरांचे पथक रुग्णवाहिकेसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
गंभीर जखमी: ८ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. Private Bus Accident
इतर जखमी: किरकोळ जखमींवर सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. या प्रकरणाचा अधिक तपास सावली पोलीस करत आहेत.
Leave a Comment