cock fight gambling in Nagbhid taluka : नागभीड २३ नोव्हेम्बर (News३४) - २३ नोव्हेम्बर रोजी नागभीड पोलिसांनी पेंढरी शेतशिवारात सुरु असलेल्या कोंबडा बाजार अड्ड्यावर धाड मारीत कारवाई केली, यामध्ये ५ आरोपीविरुद्ध कारवाई करीत एकूण २ लक्ष ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन कोंबड्याना आपसात भांडवीत त्यांच्यावर पैशाची बाजी लावण्याचे काम नागभीड तालुक्यातील पेंढरी शेतशिवारात सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी शेतशिवरातील नाल्याजवळ सुरु असलेल्या कोंबडा बाजार अड्ड्यावर धाड टाकली.
यावेळी जुगार बहाद्दूर ३३ वर्षीय जाबीर हयादखान पठाण, ३६ वर्षीय रोशन यादव देव्हारे, ३० वर्षीय खुशाल उर्फ सचिन गणेश नान्हे, ४४ वर्षीय संजय रामदास माथनकर व २५ वर्षीय निखिल रवींद्र समर्थ यांना ताब्यात घेत तीन जखमी कोंबडे, दोन लोखंडी धारदार कात्या, दोरी व रोख रक्कम सह ७ दुचाकी वाहन असा एकूण २ लक्ष ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. cock fight gambling in Nagbhid taluka
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अजिंक्य गोविंदलवार, पोलीस कर्मचारी नरेश वाढाई, दिलीप चौधरी, भरत घोळवे व प्रफुल रोहणकर यांनी केली.
Leave a Comment