BJP Candidate News : चंद्रपूर १३ जानेवारी - भिवापूर प्रभाग क्रमांक १४ मध्ये यंदा तुल्यबळ लढत पाहायला मिळत असून, मागील चार टर्म नगरसेवक असलेले वसंता देशमुख यांना यावेळी भारतीय जनता पक्षाचे अमोल शेंडे यांचे मोठे आव्हान असल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षांत नागरिकांशी ठेवलेला सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून प्रभागात करण्यात आलेली तब्बल ६ कोटी रुपयांची विकासकामे अमोल शेंडे यांच्यासाठी जमेची बाजू ठरत आहेत. (चंद्रपुरात बोगस पट्टे वाटप)
नेहमी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून येणारे वसंता देशमुख यंदा काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर जवळपास चार वर्षे महानगरपालिकेवर प्रशासक कार्यरत होते. या काळात वसंता देशमुख यांचा जनसंपर्क तुटला, असे बोलले जात आहे. मात्र याच कालावधीत आमदार किशोर जोरगेवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे अमोल शेंडे हे सातत्याने नागरिकांच्या संपर्कात राहिले. BJP Candidate News
अनेक क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबिरे तसेच इतर सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी या प्रभागात चांगली लोकप्रियता मिळवली आहे. यासोबतच आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून या प्रभागात तब्बल ६ कोटी रुपयांची महत्त्वाची विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. आता ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुकीला सामोरे जात असून, त्यांनी केलेली कामे त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरत असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी काँग्रेसचे उमेदवार वसंता देशमुख यांचाही या प्रभागात मोठा प्रभाव राहिला आहे. त्यामुळे ही निवडणूक लढत चांगलीच रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Leave a Comment