चंद्रपुरात प्रचाराचे बॅनर हटविण्यावरून वाद, उमेदवाराचा गंभीर आरोप

January 17, 2026 by Prakash Hande

Election Banner Removal : चंद्रपूर ७ जानेवारी : चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसे उमेदवारांचा प्रचारही भर रंगात आहे. ६६ जागांसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज भरले असून शहरात ठिकठीकाणी प्रचाराच्या माध्यमातून होर्डिंग, बॅनर लावण्यात आले आहे. सत्ताधारी पक्षासोबत विरोधी पक्षाच्या उमेदवारांनीही सार्वजनिक ठिकाणी जसे विद्यूत खांबावर बॅनर लावले आहे. (वडेट्टीवार घुग्गुस कांग्रेससाठी ठरले संकटमोचक)

परंतू नुकतेच आयुक्तांच्या आदेशाने केवळ विरोधी पक्षाचे बॅनर काढण्याचा सपाटा सुरु असून यामुळे प्रचाराला खिळ बसली आहे. याबाबत शिवसेना उबाठा गटाचे प्रभाग क्र. ६ इंडस्ट्रियल इस्टेट येथील उमेदवार हिमायु अली यांनी आक्षेप घेतला असून हा आयुक्तांचा पक्षपातीपणा असल्याचा आरोप त्यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केला आहे. कायद्यानुसार सर्व परवानग्या घेतल्यानंतर देखील आयुक्तांनी निवडूक अगदी जवळ येऊन ठेपली असतांना असा निर्णय घेणे चुकीचे असल्याचे सांगितले. Election Banner Removal

मूल मार्गावरील इंडस्ट्रियल इस्टेट या प्रभाग क्र. ६ मध्ये विरोधी पक्षाचे चार उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असून हिमायून अली व शिल्पा कांबळे हे शिवसेना उबाठा गटाकडून तर सुनिता खाडे व राजेशम फुल्लोरी हे वंचित बहूजन आघाडी या पक्षाकडून आपले नशिब आजमावत आहे. याबाबत आपल्या उमेदवारांचा प्रचार व्हावा यासाठी त्या-त्या प्रभागात होर्डिंग्ज व बॅनर लावण्यात आले आहे. काही बॅनर हे विद्यूत खांबाला लावण्यात आले आहे. यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांचाही समावेश आहे.

परंतू आयुक्तांनी ६ जानेवारीपासून आदेश देत यापैकी केवळ विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे बॅनर काढले. यामुळे विरोधी पक्षाच्या उमेदवारामध्ये निराशेची व संतापाची भावना निर्माण झाली आहे. कायद्यासंबंधी सर्व परवानग्या घेतल्यानंतरही आयुक्तांच्या अश्या बेजबाबदार वागण्यामुळे उमेदवारांचा प्रचाराचा उत्साह कमी झाला आहे. आयुक्तांनी अश्याप्रकारे सत्ताधारी पक्षाच्या दबावाला बळी न पडता सर्वांना समान न्याय कसा मिळेल याचा विचार करणे गरजेचे आहे अशी भावनाही यावेळी हिमायुन अली यांनी व्यक्त केली.यावेळी सुनिता खाडे व राजेशम फुल्लोरी यांचीही उपस्थिती होती.

Leave a Comment

+