Chandrapur Shirdi direct bus । खासदार धानोरकरांचा पुढाकार! चंद्रपूर-शिर्डी बस सेवा पुन्हा सुरू होणार?

January 17, 2026 by Prakash Hande

Chandrapur Shirdi direct bus

Chandrapur Shirdi direct bus : चंद्रपूर : चंद्रपूर ते शिर्डी व शिर्डी ते चंद्रपूर अशी थेट एस.टी. महामंडळाची बस सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. 

शिर्डी येथील साईबाबा मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून हजारो भाविक दरवर्षी शिर्डी येथे दर्शनासाठी जात असतात. कोरोना काळापासून हि बस सेवा  बंद करण्यात आली आहे. रेल्वे गाड्यांचे बुकिंग वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे आणि खाजगी वाहनांनी प्रवास करणे अनेकांना परवडत नसल्याने भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे एस.टी. महामंडळाने थेट चंद्रपूर - शिर्डी अशी सेवा सुरू केल्यास भाविकांसाठी प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर ठरेल, असे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले. Chandrapur to Shirdi bus

चंद्रपुरात आता मायनिंग टुरिझम

चंद्रपूरच्या महाकाली देवी मंदिरापासून ते शिर्डीच्या साई मंदिरापर्यंतचा धार्मिक प्रवास बस सेवेमुळे अधिक सुलभ होईल आणि ग्रामीण भागातीलही भाविक या सेवेमुळे लाभ घेऊ शकतील, असेही त्या म्हणाल्या. राज्य परिवहन महामंडळाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरच ही सेवा सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Chandrapur to Shirdi Direct Bus Service

Leave a Comment

+