Municipal election candidate withdrawal updates : चंद्रपूर २२ नोव्हेम्बर (News३४) - राज्यातील अनेक काळापासून प्रलंबित असलेल्या २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतीच्या निवडणुका २ डिसेम्बर रोजी होणार असून त्याचा निकाल दुसऱ्या दिवशी ३ डिसेम्बर रोजी जाहीर होणार आहे. उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून आज अनेकांनी आपले अर्ज मागे घेतले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद व १ नगरपंचायत निवडणुकीची उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या अनेकांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. १० नगरपरिषद व १ नगरपंचायत साठी नगराध्यक्ष पदाकरिता एकूण ९१ अर्ज दाखल झाले होते. ज्यामध्ये आज गडचांदूर मध्ये अपक्ष शेख रफिक निझामुद्दीन , नागभीड नगरपरिषद बाबा सेवकराम जांभुळे व उके दशरथ रामचंद्र. सदस्य अर्ज - ११. भिसी नगरपंचायत अपक्ष पाटील आकाश विनोद, अपक्ष गेडाम आशिष हनुमंत, अपक्ष घुटके देवेंद्र श्रीरंग, अपक्ष बन्सोड तुळशीराम मारोती व अपक्ष मनोज नारायण डोंगरे. सदस्य - ३.
बल्लारपूर नगरपरिषद अपक्ष कुलदिवार मीनाक्षी सुनील, सदस्य अर्ज मागे - सिद्दीकी शमीमउद्दीन जलालउद्दीन, नक्कावार राजेश नारायण, श्रीवास्तव शेखर रामेश्वर, शेख शबाना प्रवीण रशीद, अलोणे कमल शाहिराज, मोरे राहुल टीकाराम, पाटील प्रीतम नामदेवराव. भद्रावती - अपक्ष अशोक दादाजी हजारे, सदस्य - केवळ मारोती ढोके, माधव नामदेवराव बांगडे. वरोरा - अपक्ष आगलावे विभा पुरुषोत्तम, अपक्ष वरघने वसुधा शंभूनाथ. सदस्य - शेख शब्बीर रमजान, कातोरे प्रमोद सुधाकर, घुमे आशिष मारोती, मधुकर मारोती तितरे, वीरूटकर कार्तिक मारोती, ब्राह्मणकर सुनीता मारोती, शेळके गजानन दशरथ, स्वामी गौरव मनोहर राजुरा अपक्ष देशमुख विनायक शंकरराव. सदस्य - ३.
ब्रह्मपुरी - सदस्य अर्ज - शेंडे अनुकूल राजकुमार, बगमारे नोगेश वासुदेव, मेश्राम विवेक प्रेमलाल, खेत्रे सपना सुभाष, ममता शामू मालाधरे. घुग्गुस - सदस्य अर्ज मागे १४, मूल नगरपरिषद सदस्य - ३, चिमूर नगरपरिषद - सदस्य अर्ज १२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. Municipal election candidate withdrawal updates
चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ९१ अर्ज दाखल झाले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७८ उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उरले आहे. तर सदस्यपदासाठी एकूण १ हजार ३४६ अर्ज दाखल केले होते. अर्ज परत घेतल्यावर आता एकूण १ हजार २७५ उमेदवार रिंगणात उरले आहे.
चिन्ह वाटप केल्यावर २६ नोव्हेम्बर पासून उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे. २ डिसेम्बर रोजी मतदान तर ३ डिसेम्बरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
Leave a Comment