local election campaign updates : चंद्रपूर, दि. 24 नोव्हेम्बर (News३४): मुल शहरात 'न भुतो न भविष्यती' अशी कामे करण्यात आली. मुल शहराच्या सर्वांगीण आणि सर्वंकष विकासासाठी मतदारांचा मतरुपी आशीर्वाद आवश्यक आहे. मुलच्या विजयामुळे भविष्यातील विकासपर्वाचे दारे उघडेल, असा ठाम विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मनगंटीवार यांनी व्यक्त केला. जाहिर सभेसाठी मुलवासीयांनी दाखवलेली उत्स्फूर्त अफाट गर्दी ही विश्वासाचे आणि जनसमर्थनाचे प्रतीक ठरली.
मुल येथील नगरपरिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ गांधी चौकातील जाहीर सभेत ते उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. local election campaign updates
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मुल नगरवासीयांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही केलेल्या आणि पुढे करणार असलेल्या विकासकामांच्या आधारे आम्ही मतांची विनंती करीत आहोत. यासाठी मुल शहराच्या विकासाचा सविस्तर जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. कोणत्याही खोट्या आश्वासनांना किंवा भावनिक भूलथापांना बळी न पडता मुलच्या खऱ्या विकासासाठी मतदान करा. आपल्या डोळ्यांसमोर झालेली कामे, बदलत जाणारे मुलचे स्वरूप आणि निर्माण झालेल्या सुविधा हाच आपल्या निर्णयाचा खरा आधार आहे. त्यामुळे आपले अमूल्य मत विचारपूर्वक, जबाबदारीने आणि मुलच्या विकासासाठी द्यावे, असे आवाहन आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

यावेळी मुल नगरपरिषद निवडणुकीचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. मुलच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करून तयार केलेल्या ‘प्रगतीचा वचननामा’ चे उद्घाटन आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.गांधी चौकातील जाहीर सभेला मुलवासीयांनी दाखवलेल्या उत्स्फूर्त आणि ऐतिहासिक अफाट गर्दीने विजयाची खात्री आजच मिळाली असून हा केवळ कार्यक्रम नाही तर मुलच्या उज्ज्वल भवितव्याचा ठाम निर्धार असल्याचे आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले. local election campaign updates
आमदार श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, दिन, दुर्बल, वंचित, शोषित, गरीब आणि कष्टकरी यांची सेवा करण्याचा संकल्प घेऊन राजकारणात पाऊल ठेवले. मुल शहराच्या उत्पन्न आणि खर्चामध्ये 5 कोटी 17 लाख 14 हजार 485 रुपये तफावत आहे. या विभागाचा आमदार म्हणून हा निधी राज्य सरकारकडून नगरपरिषदेला उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत नागरिकांचा मालमत्ता कर वाढवला गेलेला नाही. मी आमदार म्हणून येथील नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असल्याचेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.
Leave a Comment