गॅस गळतीला ४ महिने उलटले; चौकशी थंडबस्त्यात, अझहर शेख आक्रमक

January 31, 2026 by Prakash Hande

Chandrapur STP Plant : चंद्रपूर : येथील रहमतनगर परिसरात सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी एसटीपी प्लाँट मानवी वस्तीत तयार करण्यात आली. यातून क्लोरिन वायुची गळती मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने परिसरातील अनेक मुले, प्रौढ आणि वृद्धांवर परिणाम झाला. त्यापैकी अनेकांना त्वचा आणि डोळ्यांची जळजळ झाली, ज्यामुळे शेवटी श्वसनाचा गंभीर त्रास झाला. क्लोरीन वायूमुळे काही रुग्णांच्या फुफ्फुसांचे नुकसान झाले आणि एका रुग्णाला अर्धांगवायूचा झटकाही आला. यासंदर्भात १८ सप्टेंबर २०२५ रोजी विविध राजकिय पक्षांच्या उपस्थितीत चौकशी स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतू या गोष्टीला चार महिने उलटूनही अद्याप कोणतीही समिती गठीत करण्यात आली नाही. (चंद्रपुरातील हवा झाली प्रदूषित)

त्यामुळे नागरिकांना आपले जीवन व्यतित करणे कठीण होऊन बसले आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त अकुनूरी नरेश यांनी आज ३१ जानेवारी रोजी रहमतनगर येथे भेट दिली असता सदर प्लाँट हा मानवी वस्तीपासून दुर हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती एमआयएम चे नगरसेवक अझहर शेख यांनी आज पत्रपरिषदेत दिली.

 १७ सप्टेंबर २०२५ रोजी चंद्रपूर येथील रेहमत नगर येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात घडलेल्या क्लोरीन वायू घटनेची चौकशी आणि चौकशी करा. विभागीय अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत चर्चा झालेली उच्चस्तरीय चौकशी समिती तात्काळ स्थापन करावी आणि त्यात अझहर शेख आणि एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष अमन अहमद यांचा समावेश करावा, घटनेचा तात्काळ पंचनामा तयार करावा, या गुन्हेगारी निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर आरोप लावावेत, सीएसटीपीएस आणि एसटीपीवर कडक आणि पूर्ण जबाबदारीखाली कारवाई करावा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद करावा आणि तो चंद्रपूर येथील रेहमत नगर येथून मानवी वस्तीपासून दूर असलेल्या ठिकाणी स्थलांतरित करावा. Chandrapur STP Plant

 जर प्रशासनाने एका महिन्याच्या आत दोषींना न्याय मिळवून दिला नाही तर चंद्रपूरचे लोक सीएसटीपीएस आणि एसटीपी, जिल्हाधिकारी कार्यालय, एमपीसीबी प्रादेशिक कार्यालय, चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी, चंद्रपूर आणि महानगरपालिका आयुक्त यांच्याविरुद्ध मोठा निषेध करतील आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा यावेळी अझहर शेख यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष अमान अहमद यांची उपस्थिती होती.

Leave a Comment

+