Chandrapur police law and order : चंद्रपूर,दि. 15 : चंद्रपूर शहरात 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन, 21 ऑक्टो. रोजी दिवाळी व क्रांतीवीर बाबूराव शेडमाके पुण्यतिथी कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने 15 ते 31 ऑक्टोबर पर्यंतच्या कालावधीत सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहचु नये, यासाठी कलम 36 चे पोटकलम अ ते फ महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये लागू करण्यात आले आहे.
यानुसार सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविणेबाबत, सभेचे आयोजन, मिरवणुक काढण्याबाबत, त्या ठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊडस्पिकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे.
अ) मिरवणुक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकाचे वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, ब) मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारीत करणे तसेच धार्मिक पुजास्थानाचेजवळ लोकांचे वागणुकीचे निर्बंध घालण्याचे अधिकार, क) मिरवणुकीस बाधा होणार नाही, याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजा स्थानाजवळ लोकांचे वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, ड) सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे इत्यादीचे निर्बंध घालण्याचे अधिकार, इ) रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, ई) सार्वजनिक रस्त्यावर किवा सार्वजनिक ठिकाणी लाउडस्पिकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, फ) कलम 33, 35, 37 ते 40,42,43 व 45 मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचे अधिकार. public event regulations Chandrapur
सदर आदेश लागू असताना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजविणे, लाऊडस्पिकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारीत करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार याची परवानगी घेण्यात यावी. सर्व बाबतीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलिस अधिका-यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या आदेशात नमुद आहे.
Leave a Comment