local crime news today । घुग्गुसमध्ये तलवार घेऊन दहशत माजवणारा गुन्हेगार अटकेत – पोलिसांची तातडीने कारवाई

January 17, 2026 by Prakash Hande

local crime news today

local crime news today : घुग्गुस शहरात हातात तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगाराला घुग्गुस पोलिसांनी अटक केली. सदर आरोपीवर अनेक गुन्हे दाखल असून त्याला ६ महिन्याकरिता हद्दपार करण्यात आले होते अशी माहिती आहे. banned criminal entry

१९ एप्रिल रोजी नाणी उर्फ कार्तिक स्वामी कोडापे राहणार एलसीएच क्वार्टर नकोडा हा सायंकाळी ६ वाजेदरम्यान लता मंगेशकर चौकात हातात तलवार घेऊन स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत होता, याबाबत घुग्गुस पोलिसांना माहिती मिळताच त्याला तात्काळ अटक करण्यात आली.

खंडणीचा खोटा गुन्हा येणार अंगलट?, विक्रांत सहारे यांचे खळबळजनक आरोप

आरोपी नाणी उर्फ कार्तिक कोडापे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून जानेवारी २०२५ मध्ये चंद्रपूर पोलीस दलाने ६ महिन्याकरिता जिल्हा हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती, मात्र आरोपी हा पोलिसांची नजर चुकवीत हद्दपार कारवाईला न जुमानता घुग्गुस शहरात दाखल झाला व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करायला लागला.

विशेष बाब म्हणजे हद्दपारीची कारवाई आरोपीवर झाली असताना सदर आरोपी घुग्गुस शहरात आला कसा? पोलिसांची गुप्तचर यंत्रणेला त्या आरोपीची चाहूल का बरं लागली नाही असे अनेक प्रश्न यावेळी निर्माण झाले आहे.

सदरची यशस्वी कारवाई घुग्गुस पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तायवाडे, पोलीस कर्मचारी संजय आतकूलवार, रवि वाभीटकर, नितीन मराठे, महेश भोयर व विजय ढपकस यांनी केली.

Leave a Comment

+