महाविकास आघाडीत धुसफूस; चंद्रपूरमध्ये नवी राजकीय समीकरणे, शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार?

January 17, 2026 by Prakash Hande

Vanchit Shivsena alliance : चंद्रपूर २७ डिसेंबर २०२५ - १५ जानेवारीला चंद्रपूर मनपा निवडणूक होणार असून राजकीय पक्ष १७ प्रभागात उमेदवारांची चाचपणी करीत आहे, चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी केवळ भाजप-शिवसेनेची युती झाली आहे, अजित पवार राष्ट्रवादी कांग्रेस या युतीत नाही, महाविकास आघाडी मध्येही अंतर्गत धुसफूस सुरु आहे, अश्यातच शिवसेना ठाकरे व वंचित बहुजन आघाडी मध्ये युतीची सकारात्मक चर्चा सुरु झाली असून काही जागेवर त्यांचे एकमत सुद्धा झाले आहे. (पेड न्यूज वर प्रशासनाची नजर)

चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणूक तब्बल ८ वर्षांनी होत आहे, या कालावधीत राज्याच्या राजकारणातील चित्र पूर्णतः बदललेले आहे, महानगरात भाजपला टक्कर देण्यासाठी कांग्रेसने पूर्ण तयारी केली आहे मात्र काही जागांवर मतभेद सुरु असल्याची माहिती आहे. भाजपात २८ डिसेंबरला ६६ जागेवर एकमत होत उमेदवारांच्या पहिल्या यादीची घोषणा होऊ शकते. आम आदमी पार्टीने १० उमेदवारांची यादी २६ डिसेंबर ला जाहीर केली. Vanchit Shivsena alliance

शिवसेना व मनसेची युती झाली मात्र चंद्रपुरात यावर स्थानिक नेतृत्वातर्फे अधिकृत भाष्य झाले नसले तरी शिवसेना व वंचित बहुजन आघाडीने सोबत निवडणूक लढविण्यास समर्थता दाखवली आहे. चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्यामध्ये युतीबाबत आज चर्चा करण्यात आली आहे. ३० डिसेंबर रोजी वंचित-शिवसेना यांच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर मनपा निवडणुकीत शिवसेना-वंचित सोबत युती झाली तर प्रस्थापित पक्षांचे बहुमताचे गणित पूर्णतः बदलू शकते, शिवसेना व वंचित आघाडीला मानणारा मोठा वर्ग असून याचा दोन्ही पक्षाला चांगला फायदा होणार असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Leave a Comment

+