Chandrapur motorcycle theft police arrest । रामनगर पोलिसांनी पकडले दुचाकी चोर, ५ मोटारसायकली जप्त

January 17, 2026 by Prakash Hande

Chandrapur motorcycle theft police arrest

Chandrapur motorcycle theft police arrest : चंद्रपूर ७ नोव्हेम्बर (News३४) - २६ ऑक्टोबर रोजी बंगाली कॅम्प डीआरसी हेल्थ क्लब जवळ असलेल्या पानठेल्याला लागून खाजगी नोकरी करणारे ४७ वर्षीय चंद्रहास अर्जुन मुन यांनी आपली दुचाकी वाहन क्रमांक एमएच ३४ डब्ल्यू ६७२४ हॅन्डल लॉक करून ठेवली होती. काही वेळातच सदर दुचाकी चोरीला गेल्याने मुन यांनी याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असता पोलिसांनी २ आरोपीना अटक करीत त्यांच्या ताब्यातील ५ दुचाकी वाहने जप्त केले.

Also Read : चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा हल्ला कॅमेऱ्यात कैद पण?

चंद्रपुरातील डीआरसी हेल्थ क्लब जवळ हॅन्डल लॉक करून ठेवलेली दुचाकी अज्ञाताने २६ ऑक्टोबर रोजी चोरीला गेली होती, याबाबत दुचाकी मालक मुन यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरीची तक्रार दिली. रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला.

रामनगर गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले, नागपूर जिल्ह्यातून दोघांनी दुचाकी चोरत चंद्रपुरात विकण्यासाठी आणली आहे अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे पोलिसांनी ३० वर्षीय गोपाल जीवन मालाकार राहणार शामनगर, चंद्रपूर व २२ वर्षीय आशिष उर्फ जल्लाद अक्रम शेख राहणार फुकट नगर एकता नगर चंद्रपूर यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे कबूल केले. Chandrapur stolen bike recovery

५ दुचाकीसह १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

रामनगर पोलिसांनी आरोपीकडून ५ मोटारसायकल ज्यामध्ये हिरो होंडा कंपनीची सीडी डिलक्स MH३४ डब्ल्यू ६७२४, होंडा ऍक्टिव्हा नंबर प्लेट नसलेली, सुझुकी access MH४९ AY८५९२ , हिरो स्प्लेंडर MH ४९ CN २३२०, हिरो स्प्लेंडर MH३४ BL ६२४२ जप्त करण्यात आली. सदर प्रकरणात पोलिसांनी एकूण १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील सपोनि देवाजी नरोटे, हनुमान उगले, निलेश वाघमारे, पोलीस कर्मचारी आनंद खरात, जितेंद्र आकरे, शरद कुडे, लालू यादव, बाबा नैताम, गजानन नागरे, मनीषा मोरे, रविकुमार ढेंगळे, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, संदीप कामडी, सुरेश कोरवार, रुपेश घोरपडे व ब्ल्यूटी साखरे यांनी केली.

Leave a Comment

+