चंद्रपुरात लाखोंचा नायलॉन मांजा जप्त

January 17, 2026 by Prakash Hande

dangerous kite string : चंद्रपूर १४ जानेवारी - चंद्रपूर पोलीस दल नायलॉन मांजा विरोधात कारवाई मोहीम राबवित असून या पार्श्वभूमीवर १४ जानेवारी ला गोपनीय माहितीच्या आधारे २ युवकांना ताब्यात घेत तब्बल १३७ मग नायलॉन मांजा चक्री जप्त करीत एकूण २ लक्ष ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (डेली नीड्स च्या दुकानात नायलॉन मांजाची विक्री)

प्रतिबंधी जीवघेण्या नायलॉन मांजा वर पूर्णतः प्रतिबंध व्हावा यासाठी पोलीस दलाला सूचना मिळाल्या असून सदर मांजा चा वापर व विक्री करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करणे सुरु आहे. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने १४ जानेवारीला रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी करीत दुचाकीने जात असलेल्या दोन युवकांना थांबविता झडती घेण्यात आली. सदर युवक हे नायलॉन मांजाची वाहतूक करीत होते. ३२ वर्षीय राजेश खुशाल वेसकडे, २६ वर्षीय सौरभ लहानू वाढई राहणार चंद्रपूर यांच्याजवळून प्रतिबंधित नायलॉन मांजा असलेल्या १३७ नग चक्री व दुचाकी असा २ लक्ष ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी युवकांची चौकशी केली असता सदर प्रतिबंधित नायलॉन मांजा हा गौरव गोटेफोडे राहणार चंद्रपूर यांच्याकडून आणल्याचे कबूल केले, पोलिसांनी आरोपींवर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये कलम २२३, २९२, ४९ भारतीय न्याय संहिता २०२३ सहकलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. dangerous kite string

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि संतोष निंभोरकर, पोलीस कर्मचारी जयसिंग, सचिन गुरनुले, गणेश भोयर, गणेश मोहुर्ले, संतोष येलपुलवार, दिनेश अराडे, नितीन रायपुरे, सुमित बरडे यांनी केली.

चंद्रपूर शहर व जिल्ह्यात कुणीही नायलॉन मांजा चा वापर किंवा विक्री करताना आढळून आल्यास तात्काळ नागरिकांनी पोलीस दलाचा व्हाट्सएप्प क्रमांक ७८८७८९०१०० आणि ११२ वर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

Leave a Comment

+