Chandrapur vote theft । चंद्रपुरात मतांची चोरी? एकाच घरी राहतात १०० मतदार

January 17, 2026 by Prakash Hande

Chandrapur vote theft

Chandrapur vote theft : घुग्घूस - घुग्घूस काँग्रेस शहराध्यक्ष राजू रेड्डी यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत मतदार यादीतील गंभीर त्रुटी उघड केल्या आहेत. शहरासह ग्रामीण भागातील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे "वोट चोरी" झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घुग्घूस शहरातील केमिकल वॉर्डमधील घर क्रमांक ३५० हे गेल्या काही काळापासून बंद आहे. मात्र, मतदार यादीनुसार या घरात तब्बल ११९ विविध जाती-धर्माचे मतदार राहत असल्याचे दिसून येते. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, हे घर बंद असून तिथे कोणीही राहत नसल्याचे स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे, चंद्रपूर विधानसभेतील पिंपरी या एका छोट्या गावातही एकाच घरात १०० मतदार राहत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

रामाला तलावाच्या स्वच्छता मोहिमेला गती

या गंभीर प्रकारावरून राजू रेड्डी यांनी चंद्रपूरमध्येही मोठ्या प्रमाणात "वोट चोरी" झाल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, जर एकाच पत्त्यावर इतक्या मोठ्या संख्येने मतदार दाखवले जात असतील, तर मतदारांची ओळख कशी पटवायची? निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करत, हा प्रकार मुद्दाम घडवून आणल्याचा आरोपही त्यांनी केला. Ghugus vote theft allegations Raj Reddy press conference

तर आयोगाविरुद्ध आंदोलन छेडू

या पत्रकार परिषदेत काँग्रेसने मागणी केली की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदार यादीची तातडीने दुरुस्ती करून स्वच्छ आणि पारदर्शक यादी प्रसिद्ध करावी. तसेच, अशा बोगस मतदार याद्या तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत. जर या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही रेड्डी यांनी दिला आहे.

यावेळी काँग्रेस नेते सय्यद अन्वर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

+