Chandrapur police raid on banned tobacco । 🕵️‍♂️ तंबाखू माफियांचा पर्दाफाश – अन्न व औषध प्रशासन झोपेत, पोलिसांचं 'एक्शन मोड'!

January 17, 2026 by Prakash Hande

Chandrapur police raid on banned tobacco

Chandrapur police raid on banned tobacco : चंद्रपूर - राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखूचा व्यापार चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जोमात सुरु आहे, मात्र या अवैध व्यापारावर अन्न व औषध प्रशासन विभाग पूर्णतः अयशस्वी ठरलं आहे. सध्यातरी पोलीस यंत्रणा यावर कारवाई मोहीम राबवित असताना दिसत आहे. flavored tobacco

३ महिलांची शिकार करणारी वाघीण जेरबंद

चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुनोना चौकात किराणा व्यवसायी ने आपल्या दुकानात प्रतिबंधित तंबाखू ठेवला आहे अशी गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक बच्छीरे यांना ९ मे रोजी मिळाली होती. माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी धाड मारली असता यामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा आढळला.

पुरवठादार वसीम झिमरी

या कारवाईत शहर पोलिसांनी ईगल हुक्का शिशा तंबाखू असा एकूण २७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, किराणा दुकान व्यवसायी ३२ वर्षीय नितेश मुकुंदा वाकडेची चौकशी केली असता त्याने हा माल तंबाखू पुरवठादार वसीम झिमरी यांचेकडून आणला असल्याचे सांगितले पोलिसांनी दोघांवर अन्न व सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले. hookah tobacco seized in Chandrapur

https://youtu.be/Jap3gDtKEGs?si=q0liA3ksqUAFbw1H

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक बच्छीरे व गुन्हे शोध पथकाने केली.

Leave a Comment

+