MagSafe for Android Phones : तंत्रज्ञान - Apple ने 2020 मध्ये iPhone 12 सीरिजसोबत MagSafe वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञान सादर केले. पारंपरिक वायरलेस चार्जिंगपेक्षा हे तंत्रज्ञान वेगळे ठरते, कारण यात चार्जिंग कॉइल अचूक बसवण्यासाठी गुरुत्वाकर्षण किंवा अंदाजावर अवलंबून राहावे लागत नाही. फोन आणि चार्जर एकमेकांशी घट्ट जोडण्यासाठी चुंबकांचा वापर केला जातो. ही पद्धत सोपी, स्वस्त आणि अधिक प्रभावी मानली जाते.
मात्र, इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही बहुतेक स्मार्टफोन उत्पादकांनी हे तंत्रज्ञान स्वीकारण्यास टाळाटाळ का केली, हा प्रश्न निर्माण होतो. विशेष म्हणजे, Qi वायरलेस चार्जिंग मानकात Magnetic Charging Profile अधिकृतरीत्या समाविष्ट करण्यात आला असतानाही Android ब्रँड्स मागेच राहिले.
Android जगतात या दिशेने पहिले पाऊल HMD Skyline या स्मार्टफोनने टाकले, ज्यामध्ये अंगभूत चुंबक देण्यात आले. त्यानंतर काही चिनी कंपन्यांनी अर्धवट उपाय म्हणून फक्त निवडक मोबाइल कव्हर्समध्येच चुंबक देण्यास सुरुवात केली. आता मात्र परिस्थिती बदलताना दिसत आहे. Google ने Pixel 10 सीरिजसोबत ‘Pixelsnap’ अॅक्सेसरीज सादर करत या ट्रेंडमध्ये उडी घेतली आहे. तसेच Samsung चा Magnet Wireless Charger आगामी Galaxy S26 सीरिजआधीच चर्चेत आला आहे.
बर्याच वापरकर्तांना वाटते की त्यांना वायरलेस चार्जिंगची गरज नाही. मात्र, चुंबकीय अटॅचमेंटचे फायदे फक्त चार्जिंगपुरते मर्यादित नाहीत. कारमध्ये लावण्यासाठी फोन होल्डर, मोबाईलच्या मागे लावता येणारी छोटी वॉलेट्स, तसेच कॅमेरा ग्रिप, बाह्य SSD, गेम कंट्रोलर यांसारख्या अनेक MagSafe-आधारित अॅक्सेसरीज आता उपलब्ध आहेत. Android फोनमध्ये चुंबकीय सपोर्ट नसल्यामुळे वापरकर्ते या सुविधांपासून आजपर्यंत वंचित राहिले. MagSafe for Android Phones
याशिवाय, वायरलेस चार्जिंगमध्ये कॉइल अचूक न बसल्यास उष्णता वाढते आणि चार्जिंगची कार्यक्षमता कमी होते. चुंबकीय चार्जिंगमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होते.
आता प्रश्न असा आहे की, नवीन स्मार्टफोन खरेदी करताना चुंबकीय वायरलेस चार्जिंग सपोर्ट असणे किंवा नसणे तुम्हाला किती महत्त्वाचे वाटेल? आगामी काळात Android ब्रँड्स या तंत्रज्ञानाकडे किती गांभीर्याने पाहतात, यावरच उत्तर अवलंबून असेल.
Leave a Comment