illegal weapon seizure by Rajura police :चंद्रपूर / राजुरा - जिल्ह्यातील राजुरा शहरात तलवार बाळगणाऱ्यावर पोलीस कारवाई सत्र राबवित असून २७ जुलै रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रेल्वे वसाहत समोरील परिसर, सोनिया नगर मध्ये तलवार सहित एकाला अटक करण्यात आली.
२ दिवसात राजुरा पोलिसांनी दोन जणांवर अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्यावर कारवाई केली आहे, ४२ वर्षीय पवन किरण वनकर राहणार आंबेडकर वॉर्ड याला ताब्यात घेत त्याचे जवळून ८६ सेंटीमीटर लांबीची धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. आरोपीवर भारतीय हत्यार कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
जिल्ह्यात गुन्हेगारी वृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, गुन्हे करण्याच्या उद्देशाने आधीच अवैध शस्त्र स्वतःजवळ बाळगून गुन्हेगार दहशत निर्माणक करण्याचे काम करीत आहे, मात्र पोलिसांच्या सतर्कतेने गुन्हा घडण्यापूर्वी आरोपी व शस्त्र जप्त करण्याचे कसोशीने प्रयत्न केले जात आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात पोउपनि भीष्मराज सोरते, पोलीस कर्मचारी किशोर तुमराम, विक्की निर्वाण, रामेश्वर चहार, शफिक शेख, महेश बांबोळे व राजीव दुबे यांनी केली.
Leave a Comment