Kishor Jorgewar graduate voter initiative । पदवीधर मतदार नोंदणी मोहिमेत चंद्रपूर अव्वल ठेवण्याचा आमदार किशोर जोरगेवारांचा निर्धार!

January 17, 2026 by Prakash Hande

Kishor Jorgewar graduate voter initiative

Kishor Jorgewar graduate voter initiative : चंद्रपूर ४ ऑक्टोबर २०२५ - पदवीधर हा समाजातील सुशिक्षित घटक आहे. त्याचे मत केवळ मतदानापुरते मर्यादित नसते, तर ते समाजाला दिशा देणारे असते. त्यामुळे प्रत्येक पदवीधर मतदार म्हणजे लोकशाहीचा बळकट दुवा आहे. या दुव्यांना जोडल्याशिवाय लोकशाहीची साखळी मजबूत होणार नाही. त्यामुळे उत्तम नियोजन करत प्रत्येक पदवीधर मतदारांची नोंदणी करून नोंदणी प्रक्रियेत चंद्रपूर मतदार संघ अव्वल ठेवा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

Also Read : चंद्रपुरात २८५ जणांना शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र वाटप

भारतीय जनता पार्टीच्या वतीने पदवीधर निवडणुकीसाठी नोंदणी अभियान राबविण्यात येणार असून, शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी उपमहापौर अनिल फुलझले, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, भाजप नेते प्रकाश देवतळे, दशरथसिंह ठाकुर, महामंत्री सविता दंढारे, अरुण तिखे, मंडळ अध्यक्ष अॅड. सरिता संदुरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. Chandrapur BJP graduate voter enrollment campaign

भारतीय जनता पार्टीच्या भविष्यातील राजकीय प्रवासाचा पाया

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, पदवीधर मतदार नोंदणी अभियान ही केवळ औपचारिकता नसून, भारतीय जनता पार्टीच्या भविष्यातील राजकीय प्रवासाचा पाया आहे. पदवीधर मतदार नोंदणीमध्ये आपला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला पाहिजे. आजच्या या बैठकीत आपण उत्तम नियोजन करून पुढे जाण्याचा निर्धार करा. नोंदणी मोहिमेत दैनंदिन आढावा घेणे आवश्यक आहे. प्रत्येक दिवसाची आपली प्रगती, आलेल्या अडचणी यांचा दैनंदिन आढावा घ्यावा, संघटित नियोजन करावे, अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर बैठकीत कार्यकर्त्यांना केल्या.

प्रत्येक पदवीधर मतदाराचा सहभाग ही लोकशाहीची ताकद आहे. आपण संघटित नियोजन, सातत्यपूर्ण प्रगती आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाने ही मोहीम यशस्वी करू. पदवीधर म्हणजे केवळ शिक्षणाची पदवी मिळालेली व्यक्ती नव्हे, तर समाजाला मार्गदर्शन करण्याची क्षमता असलेला नागरिक आहे. त्यामुळे पदवीधर मतदार संघासाठीच्या निवडणुकीत पदवीधरांचा सक्रिय सहभाग गरजेचा आहे, असे ते यावेळी म्हणाले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Comment

+