illegal oyo hotels in chandrapur : चंद्रपूर - जोडप्यांचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या OYO हॉटेल चा लोगो वापरणाऱ्या हॉटेल व लॉजेस मालकांवर चंद्रपुरात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काही महिन्यापूर्वी आमदार जोरगेवार यांनी oyo हॉटेल्स ची चौकशी करण्याची मागणी केली होती, पावसाळी अधिवेशनात माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ओयो प्रकरण चांगलेच गाजवले. जगभरात ओयो हॉटेलचे लाखो रूम्स आहे मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अवैध पद्धतीने कंपनीच्या संमती शिवाय ओयो सुरु आहे. oyo trademark misuse cases
अहमदाबाद मधील OYOचे नोडल अधिकारी यांनी १८ जुलै रोजी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली कि ओयो रूम्स हि कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी असून ओयो रूम्स हे कंपनीचे ट्रेडमार्क आहे, इतर हॉटेलपेक्षा कमी बजेट मध्ये ओयो रूम्स उपलब्ध होतात मात्र चंद्रपुरात ओयो कंपनीचा ब्रँड लोगो बनावट पध्द्तीने बनवीत त्याचा हॉटेल व लॉज मालक व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी कंपनीकडे प्राप्त झाल्या होत्या. fake oyo hotel logo case chandrapur
चंद्रपुरात गांजा विक्री महिलांच्या हाती
याबाबत शहानिशा करण्यासाठी कंपनीचे नोडल अधिकारी मनोज पाटील यांनी गोपनीयरित्या याबाबत माहिती घेतली असता चंद्रपूर शहरातील एकूण १५ हॉटेल व लॉजेस कंपनीच्या संमतीशिवाय बनावट ओयो लोगो वापरीत त्याचा व्यवसायात गैरवापर करीत असल्याचे आढळले. याबाबत नोडल अधिकारी यांनी संबंधित हॉटेल व लॉज मालकांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली.
चंद्रपूर शहर पोलिसांना तक्रार प्राप्त होताच संबंधित हॉटेल व लॉज मालकांवर भारतीय न्यायसंहिता २०२३ सहकलम १०३, १०४ ट्रेडमार्क अधिनियम १९९९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहर हद्दीतील ८ लॉजेस वर धाडी टाकत आवश्यक कारवाई करण्यात आली असून सदर प्रकरणाचा पुढील व सखोल तपास सुरु करण्यात आला आहे.
Leave a Comment