Chandrapur BJP Internal Conflict : चंद्रपूर ३ जानेवारी - चंद्रपूर मनपा निवडणुकीत भाजपच्या गोंधळामुळे निष्ठावंत कार्यकर्ते चांगलेच संतापले आहे, एबी फॉर्म वाटप करण्याच्या दिवशी अधिकृत यादीमधील भाजप उमेदवारांना फॉर्म न देता यादी बदलवित दुसऱ्यांना फॉर्म वाटप केल्याने भाजप पक्षाने महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांची तात्काळ हकालपट्टी केली. यावर माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले असून घडलेल्या या प्रकारची पक्षाने दखल घेत अध्यक्षांची हकालपट्टी केली आहे.
१६ जानेवारी नंतर भाजप नेते घडलेल्या प्रकारावर गंभीर कारवाई करतील, सध्या निवडणूक महत्वाची आहे, सध्या मनपा मध्ये भाजपच्या उमेदवारांना निवडून आणणे हे महत्वाचे, ज्याप्रमाणे ऑपरेशन करताना बीपी व शुगर नॉर्मल झाल्यावर पुढील प्रक्रिया डॉक्टर करतात, यावर सुद्धा प्रक्रिया पार पडेल पण निकालानंतर. (रोशन कुडे किडनी विक्री प्रकरण, शेतकरी नेते बच्चू कडू यांचा लॉंगमार्च)
भाजपच्या अनेक निष्ठावंतांवर उमेदवारी देताना अन्याय झाला आहे, घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. पण सध्या निवडणूक महत्वाची आहे. आम्ही प्रभागनिहाय बैठका सभा यावर सध्या काम करीत आहो अशी प्रतिक्रिया आमदार मुनगंटीवार यांनी दिली. Chandrapur BJP Internal Conflict
चंद्रपूर मनपा निवडणूक जाहीर होताच उमेदवारी देण्यावरून आमदार जोरगेवार-मुनगंटीवार यांच्यामध्ये वातावरण तापले होते, आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी असा दोघांचा आग्रह होता. भाजपने पक्ष उमेदवाराची अधिकृत यादी पाठविल्यावर महानगर अध्यक्ष कासनगोट्टूवार यांनी यादीमध्ये अनेक बदल केले, त्यानंतर एबी फॉर्मचे वाटप करताना एकाच प्रभागात उमेदवारांना दोन एबी फॉर्म देण्यात आल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. काहींना तर एबी फॉर्म ची झेरॉक्स देण्यात आली. आमदार जोरगेवार यांच्या नेतृत्वातील प्रथम निवडणूक हि घुग्गुस नगरपरिषदेची लढविण्यात आली मात्र भाजपचा पराभव झाला.
चंद्रपूर भाजपात प्रथमच इतका गोंधळ उडाला होता, अनेक भाजप निष्ठावंतांनी आपला संताप व्यक्त केला, ज्यांची नावे अधिकृत यादी मध्ये होती मात्र दुसऱ्या यादीतून नावे वगळल्याने भाजप कार्यकर्ते अपक्ष निवडणूक लढवीत आहे. येणाऱ्या १२ दिवसात भाजप चमत्कार घडविणार कि यंदा मनपा निवडणुकीत अपक्षांचा बोलबाला राहणार? हे १६ जानेवारीला पुढे येणारचं.
Leave a Comment