fatal pickup truck accident near Ganpur । चंद्रपूर जिल्हा हादरला – गणपूरजवळील अपघातात मृत्यूचा थरार!

January 17, 2026 by Prakash Hande

fatal pickup truck accident near Ganpur

fatal pickup truck accident near Ganpur : चंद्रपूर- अहेरी मार्गावरील गणपूरजवळ पिकअप-ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (दि. १३) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्याला बेदम मारहाण

किराणा सामान घेऊन निघाले मात्र

संदीप कुळमेथे, रमेश वाढई रा. कोठारी अशी मृतकांची नावे आहेत. गणेश मडावी हा जखमी आहे.
किराणा सामान घेऊन पिकअप एमएच ३४ बीजी ८८९९ गोंडपिपरीकडे निघाले होते. कोठारी येथील संदीप कुळमेथे,रमेश वाढई, कवडजई येथील गणेश मडावी हे तिघे होते.

https://youtu.be/IhPKmjL9OEA?si=-0siTW7R-cXTsqOt

गोंडपिपरी येथून बल्लारपूरकडे जाणाऱ्या ट्रकला पिकअपने धडक दिली. समोरासमोर झालेली हि धडक इतकी भीषण होती कि यामध्ये पिकअपमधील संदीप कुळमेथे, रमेश वाढई यांचा मृत्यू झाला. गणेश मडावी हा जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

+