BJP AB Form Issue : चंद्रपूर ६ जानेवारी - चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत चुरस निर्माण झाली आहे मात्र पूर्वी उमेदवारी देण्यासाठी कांग्रेस व भाजपात स्पर्धा रंगलेली होती, भाजप व कांग्रेस पक्षात निष्ठावंतांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला. भाजपने एबी फॉर्म देण्यात गडबडी केल्या, यामुळे भाजप महानगर अध्यक्ष कासनगोट्टूवार यांचं पद गेलं. (चंद्रपूर मनपा निवडणूक- विठ्ठल मंदिर प्रभागात यंदा बदलाचे वारे)
भाजपच्या या धोरणामुळे चंद्रपूर मनपा मधील प्रभाग क्रमांक १० एकोरी मध्ये भाजपचा अधिकृत उमेदवार हा अपक्ष झाला, पक्षाला त्या उमेदवाराला समर्थन देण्याची वेळी आली आहे. चंद्रपूर भाजपात एबी फॉर्म वाटपाच्या गोंधळात अनेकांच्या प्रभागात अधिकृत व अनधिकृत उमेदवाराला एबी फॉर्म देण्यात याले या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता.
असाच एक गोंधळ एकोरी प्रभाग क्रमांक १० मध्ये उडाला, ब गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला भाजप उमेदवार सरिता विकास घटे यांचा अधिकृत उमेदवारी अर्जातील एबी फॉर्म मध्ये त्रुट्या निघाल्याने त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागत आहे. ब गटातून उमेदवारी अर्ज भाजपकडून घटे यांनी दाखल केला, मात्र भाजपच्या गोंधळाने त्यांना ब गटाऐवजी दुसऱ्या गटाचा एबी फॉर्म देण्यात आला. BJP AB Form Issue
छाननी प्रक्रियेत घटे यांचा एबी फॉर्म बाद झाला आणि त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले, एकोऱी प्रभागातून भाजपच्या उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहे, कमळ ऐवजी त्यांना आता एअर कंडिशनर हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. एकतर भाजपला एकोरी प्रभागात उमेदवारांची वानवा होती, उमेदवार मिळाल्यावर सुद्धा त्यांना भाजप समर्थन द्यावे लागत आहे. म्हणजेच पक्षाचा उडालेल्या गोंधळामुळे उमेदवार कमळ चिन्हापासून वंचित झाला.
Leave a Comment