Bachchu Kadu Long March : नागभीड ३ जानेवारी : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी रोशन कुडे सावकार कर्ज ते किडनी विक्री प्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मिंथूर ते नागभीड, असा ९ किमीचा लाँग मार्च शनिवारी काढण्यात आला. रोशन कुळे यांच्या घरापासून ७ किमीवरील नागभीडपर्यंत शनिवारी लाँग मार्च काढण्यात आला. (तुमचा उमेदवार शिक्षित कि गुन्हेगार)
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते व माजी आमदार बच्चू कडू व शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात निघालेला लाँग मार्चचे नागभीडच्या राममंदिर चौकात पोहोचताच शेकडो शेतकरी व नागरिक सहभागी झाले. त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तहसीलदार उमेश कावळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. हा लाँग मार्चचे नागभीड येथील राममंदिर चौकात सुमारे १५ मिनिटे ठिय्या आंदोलनात रूपांतर झाले. यामुळे वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी काही व्यक्तींकडून पेट्रोलच्या बाटल्या व टायर जप्त केल्याने कुठलेही गालबोट लागले नाही.
मिंथूर येथील शेतकरी रोशन शिवदास कुळे याच्या किडनी विक्रीपर्यंत गेलेल्या कर्जप्रकरणाने राज्य हादरले आहे. हे प्रकरण एका शेतकऱ्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण शेतकरी वर्गाच्या वेदना दर्शवते. एका महिन्यात रोशन कुळेची जमीन परत मिळाली नाही आणि त्याची लुबाडलेली रक्कम परत झाली नाही तर शासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा यावेळी आंदोलनाला संबोधित कराना माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला. तसेच ३० जूनपर्यंत कर्जमाफी जाहीर न झाल्यास १ जुलैपासून महाराष्ट्रात रेल्वे रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी बच्चू कडू यांनी दिला. Illegal Moneylending
यावेळी एसआयटी प्रमुखांनी प्रकरणात अटक झालेल्या सावकारांवरील गुन्ह्यांची माहिती दिली. तसेच डीडीआर यांनी एका महिन्यात रोशन कुळेची शेती परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. या सभेला रोशन कुळे यांची आई निर्मला, पत्नी रोहिणी, मुलगी तृषा, माजी आमदार वामनराव चटप, जि. प. माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, सीपीआयचे विनोद झोडगे, पंजाबराव गावंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद व गिरीश नवघडे, माजी सभापती प्रणया गड्डमवार, दामोदर वाढवे यांच्यासह अनेक नेते व शेतकरी उपस्थित होते. एक लाखाच्या कर्जासाठी ७४ लाखांची परतफेड करूनही शेती, वाहने विकावी लागली आणि किडनी विकण्याची वेळ येणे हे व्यवस्थेचे अपयश आहे, असा सूर अन्य मान्यवरांनी काढला.
Leave a Comment